ETV Bharat / state

उझबेकिस्तानमध्ये अडकलेल्या 'त्या' डॉक्टरांचा समूह लवकरच परतणार मायदेशी - ranjitsinh naik nimbalkar

ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे पर्यटनासाठी गेलेल्या व तिथे अडकलेल्या डॉक्टरांना भारतात परत आणण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ताश्कंदमधील भारतीय दूतावासमधील राजदूत असणारे संतोष झा यांच्याशी फोनवरुन संपर्क केला असून त्यांना लवकरच भारतात परत आणणार असल्याची माहिती आहे.

उझबेकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या डॉक्टरांना परत आणणार

author img

By

Published : Mar 19, 2020, 10:50 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील ताश्कंद शहरात अडकलेले डॉक्टर लवकरच परतणार असल्याची माहिती आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ह्यांनी त्या अडकलेल्या डॉक्टरांना भारतात परत आणण्यासाठी तेथील राजदूत यांच्याशी फोनवरून माहिती घेतली. तसेच ते उद्या (शुक्रवार) परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.

उझबेकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या डॉक्टरांना परत आणणार

करमाळा तालुक्यातील ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे पर्यटनासाठी गेलेल्या व तिथे अडकलेल्या डॉक्टरांना भारतात परत आणण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ताश्कंदमधील भारतीय दूतावासमधील राजदूत असणारे संतोष झा यांच्याशी फोनवरुन संपर्क केला. तसेच याबाबत गुरुवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचा - Coronavirus : करमाळा तालुक्यातील 15 डॉक्टरांचा ग्रुप अडकला उझबेकिस्तानमध्ये

तालुक्यातील करमाळा, कंदर, बिटरगावसह १३ डॉक्टर पर्यटनासाठी गेले होते. ते भारतातून 10 मार्चला उझबेकिस्तानला जाणार असताना तेथे कोरोना अजिबात नव्हता. मात्र, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने परतीच्या प्रवासासाठी असणारे त्यांचे विमान रद्द झाल्याने त्यांना भारतात येण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे ते तिथेच अडकले. यानंतर, त्यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले.

याबाबत भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दीपक चव्हाण, भाजप शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, नरेंद्र ठाकूर, महादेव फंड ह्यांनी प्रत्यक्ष भेटून याची माहिती व गांभीर्य खासदार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत व त्यांच्याशी संपर्कात आहेत.

हेही वाचा - शहरातील बुधवारचा बाजार प्रशासनाने पाडला बंद, गर्दी टाळण्याच्या आवाहनानंतरही जमले व्यापारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.