ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजीत डिसले यांना 7 कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

author img

By

Published : Dec 3, 2020, 11:44 PM IST

Updated : Dec 4, 2020, 4:39 AM IST

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीत डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली.

Global Teacher Award to a teacher from Solapur
सोलापूरच्या शिक्षकाला ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर- युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीत डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीत डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. रणजीत डिसले यांना हा पुरस्कार मिळाल्याने माढा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार माढा तालुक्यातील परितेवाडी येथील शिक्षक रणजीत डिसले यांना मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. हा पुरस्कार मिळवणारे रणजीत हे भारतातील पहिले शिक्षक ठरले आहेत. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

140 देशांमधील शिक्षकांमधून डीसले यांची निवड

जगभरातील 140 देशांतील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांमधून या पुरस्कारासाठी रणजीत यांची निवड करण्यात आली. डीसले गुरुजींनी विकसित केलेल्या क्‍यूआर कोड पद्धतीचा प्रथम महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्ककांमध्ये वापर केला. त्यानंतर देशभरात त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली. हा शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठा क्रांतिकारक बदल समजला जातो. आता त्यांच्या याच क्‍यूआर कोड पद्धतीची जागतिक पातळीवरून दखल घेण्यात आली असून, त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज रणजित डिसले यांना सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, त्यांनी लगेच एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे जाहीर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Last Updated : Dec 4, 2020, 4:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.