ETV Bharat / state

संतापजनक..! कोविड सेंटर म्हणून घोषित केलेल्या मुलींच्या वसतिगृहात लाजिरवाणा प्रकार; कपड्यांवर आक्षेपार्ह मजकूर - solapur girls hostel news

सोलापुरातील मुलींच्या वसतिगृहात, कोविड रुग्णांना ठेवण्यात आले होते. तेव्हा त्या रुग्णांनी वसतिगृहात मुलींनी ठेवलेल्या कपड्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचे समोर आले आहे. हा संतापजनक प्रकार समोर येताच महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Girls hostel vandalized by covid patients in solapur
संतापजनक..! कोविड सेंटर म्हणून घोषित केलेल्या मुलींच्या वसतिगृहात लाजिरवाणा प्रकार; कपड्यांवर आक्षेपार्ह मजकूर
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:18 AM IST

सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींचे वसतिगृह अनेक दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहे. या वसतिगृहाचा उपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर कारागृहामधील कैद्यांना त्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून, त्यांना पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. काही दिवसांनी या ठिकाणी पुन्हा एका कोविड रुग्णाला दाखल केले असता एक लाजिरवाणा व संतापजनक प्रकार समोर आला आहे.

माहिती देताना सोलापूर महानगरपालिका उपायुक्त...

वसतिगृहातील मुलीं लॉकडाऊन काळाता घाई गडबडीत आपले कपडे हॉस्टेलमध्ये विसरून गेल्या होत्या. त्या कपड्यांवर अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. त्यांच्या अंतरवस्त्रांवर आक्षेपार्ह मजकूर लिहण्यात आले आहे. हा संतापजनक प्रकार समोर येताच महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मार्च महिन्यामध्ये अचानक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यावेळी शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींनी गडबडीत हॉस्टेल सोडले होते. या गडबडीत मुलींचे अनेक साहित्य हॉस्टेल मध्येच राहिले. 12 एप्रिलला कोरोना महामारीची सोलापुरात साथ सुरू झाली. त्यानंतर अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळण्यास सुरुवात झाली. अशात सोलापूर कारागृहातील काही कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. जवळपास 100 कैद्यांना या मुलींच्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. 14 दिवस त्यांच्यावर उपचार करून त्यांची पुन्हा सोलापूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

कैद्यांनंतर येथे कोणालाही क्वारंटाईन करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी एका नागरिकाला शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले. तेव्हा त्याने मुलीच्या अंतरवस्त्रांवर आक्षेपार्ह मजकूर लिहण्यात आले असल्याची माहिती माध्यमांना दिली व हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यावर सोलापूर महानगरपालिका उपआयुक्त धनराज पांडे यांनी चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.