ETV Bharat / state

Girl commits suicide : दहावीत नापास होण्याच्या भीतीपोटी तरुणीने संपवले जीवन; निकालात मिळाले 81 टक्के गुण - शेततळ्यात उडी मारुन तरुणीची आत्महत्या

अमृताने एप्रिल २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाहीत, यामुळे ती तणावात होती. गुण चांगले मिळतील म्हणून घरच्यांनी तिची समजूत काढली होती. मात्र तरीही तिने गुरुवारी मध्यरात्री शेततळ्यात उडी मारुन आपले जीवन संपवले. शुक्रवारी लागलेल्या दहावीच्या निकालाच अमृताला 81 टक्के गुण मिळाल्याचे जाहीर होताच, नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Girl commits suicide In Solapur
अमृता दाजीराम लोंढे
author img

By

Published : Jun 18, 2022, 2:28 PM IST

सोलापूर - दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळण्याच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली, मात्र निकालात तिला 81 टक्के गुण मिळाले आहेत. ही हृदयद्रावक घटना माढा तालुक्यातील घोटी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अमृता दाजीराम लोंढे असे त्या आत्महत्या केलेल्या दु्र्दैवी मुलीचे नाव आहे. अमृताने शेततळ्यात उडी मारुन आपले जीवन संपवल्याने घोटीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अमृता होती तणावात -अमृताने एप्रिल २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाहीत, यामुळे ती तणावात होती. गुण चांगले मिळतील म्हणून घरच्यांनी तिची समजूत काढली होती. गुण कमी मिळाल्यास लोक काय म्हणतील या भीतीने ती वावरत होती. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनाही जाणवत होती. अशावेळी तिच्या माता-पित्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही.

घरातून निघून गेली आणि आत्महत्या केली - गुरुवारी 16 जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ती कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. घरात ती दिसत नसल्याने नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शिवराम मोहन लोंढे यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत टेम्भुर्णी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलीस कर्मचारी अश्पाक शेख करत आहेत.

निकालात अमृताला मिळाले 81 टक्के गूण - दहावीत चांगले गुण मिळणार नाहीत, म्हणून अमृताने गुरुवारच्या मध्यरात्रीच घरातून निघून गेली. त्यानंतर तिने शेततळ्यात उडी मारुन आपले जीवन संपवले. मात्र शुक्रवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात अमृताला 81 टक्के गुण मिळाले. त्यामुळे अमृताने केवळ गुण कमी मिळण्याच्या भीतीने जीवन संपवल्याचे उघड झाले. अमृताला 81 टक्के गूण मिळाल्याची माहिती गावात कळताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.