ETV Bharat / state

धक्कादायक : तीन नराधमांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार - अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार

माळशिरस तालुक्यातील उघडेवारी इथे ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह उघडेवाडी गावात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात होती. त्यावेळी वाटेत तीन नराधमांनी तिला अडवले आणि तिची छेड काढली. त्यानंतर पीडितेला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

gangrape on minor girl in malshiras
धक्कादायक : तीन नराधमांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Nov 1, 2021, 8:35 PM IST

सोलापूर - सर्वत्र दिवाळी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे सोलापूरातील माळशिरसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळापूर पोलीस स्टेशनच्या परिसरात एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. माळशिरस तालुक्यातील उघडेवारी इथे ही घटना घडली आहे.

दवाखान्यात जात असताना केले कृत्य -

पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह उघडेवाडी गावात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात होती. त्यावेळी वाटेत तीन नराधमांनी तिला अडवले आणि तिची छेड काढली. त्यानंतर पीडितेला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

आईने केली तक्रार -

पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली.

हेही वाचा - मित्रानेच केला घात; बिर्याणीतून गुंगीचे औषध देऊन केला तरुणीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.