ETV Bharat / state

भाजप उपमहापौर काळे यांच्या रुपभवानी मंदिर परिसरातून मुसक्या आवळल्या - सोलापूर गुन्हे बातमी

महापालिका उपायुक्तांना शिविगाळ करत पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या पालिका उपायुक्त राजेश काळेंच्या मुसक्या आवळण्यास सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून काळे हे फरार होते.

उपमहापौर काळेसह पोलीस पथक
उपमहापौर काळेसह पोलीस पथक
author img

By

Published : Jan 5, 2021, 5:08 PM IST

Updated : Jan 5, 2021, 5:16 PM IST

सोलापूर - महापालिका उपायुक्त धनराज पांडेंना पाच लाख रुपयांची खंडणी मागून शिवीगाळ करणारा फरार उपमहापौर राजेश काळे यांना मंगळवारी (दि. 5 जाने.) सकाळी रुपाभवानी मंदिर परिसरातून अटक केले आहे. ही कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेने केली आहे. उपायुक्त धनराज पांडेंना शिविगाळ केल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 29 डिसेंबरला याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

पुण्याहून तुळजापूरकडे निघाला होता

29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर राजेश काळे हे गायब होता. त्याच्याविरोधात भा.दं.वि.चे कलम 353, 385, 294 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आज (मंगळवार) सकाळी पुण्याहून तुळजापूरकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने रुपाभवानी मंदिरात सापळा लावला होता. राजेश काळे मंदिर परिसरात मोटारीतून येताच त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी धडपड सुरू केली. राजेश काळे हे पळून जाण्याचा तयारीत असताना, त्याचा पाठलाग करून मंदिर परिसरात त्याच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.

सोशल मीडियावरून ऑडीओ क्लिप व्हायरल

उपमहापौर राजेश काळे हे पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिविगाळ करत असल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून सोलापूर महानगरपालिकेत चर्चेचा विषय झाला होता. भाजप पक्षानेही उपमहापौर काळे विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे. भाजप आमदाराच्या 'लोकमंगल' या सामाजिक संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी उपमहापौर काळे हे 'ई-टॉयलेट' मागत असल्याचेही त्या ऑडीओ क्लिपमध्ये आहे.

लोकमंगलने हात झटकत केला खुलासा

भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या सामाजिक संस्था लोकमंगलने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या विवाह सोहळ्यात 'ई-टॉयलेट' पाहिजे म्हणून पालिका उपायुक्त धनराज पांडेना शिविगाळ केली होती. मात्र, आमच्या संस्थेचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे म्हणत लोकमंगल या सामाजिक संघटनेने जाहीर खुलासा करत हात झटकले आहे.

पुण्यातही आहेत राजेश काळेच्या नावे गुन्हे दाखल -

पुण्यातील सांगवी येथील एका फ्लॅटविक्री प्रकरणात काळे यांना मे 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. उपमहापौरांनी पुण्यातील सांगवी येथील एकच फ्लॅट चार ते पाच जणांना विकला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काळे यांच्या विरुद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी काळे यांच्या साथीदारांनाही आगोदरच अटक करण्यात आलेली होती.

हेही वाचा - सोलापूरातील लक्ष्मी मंडई गाळ्यांचा वाद अखेर संपुष्टात

हेही वाचा - 'धर्मराज कडादी सुज्ञ असल्याने चिमणी पाडण्यास सहकार्य करतील'

Last Updated : Jan 5, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.