ETV Bharat / state

भाजी मंडईतील व्यापाऱ्यांवर कारवाई.. फळ,भाजी विक्रेत्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा - सोलापूर बातमी

विजापूर वेस येथील लक्ष्मी मार्केटमध्ये रविवारी फळ विक्रेते व भाजी विक्रेते हातगाड्यावर व खाली बसून फळे, भाजी विकत होते. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत फळे, भाजी व हातगाड्या जप्त केली. या कारवाई वेळी भाज्यांचे व फळांचे नुकसान झाले.

fruit-and-vegetable-sellers-march-on-police-station-in-solapur
भाजी मंडईतील व्यापाऱ्यांवर कारवाई..
author img

By

Published : Jul 7, 2020, 1:14 PM IST

Updated : Jul 7, 2020, 1:31 PM IST

सोलापूर - लक्ष्मी मार्केटमधील फळ विक्रेत्यांवर आणि भाजी विक्रेत्यांवर रविवारी सकाळी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाई विरोधात विक्रेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत फौजदार चावडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

भाजी मंडईतील व्यापाऱ्यांवर कारवाई..

कोरोना संसर्गजन्य महामारी रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सोलापूरातील अनेक भाजी मंड्या बंद आहेत. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील होम मैदानावर भाजी व फळ विक्री करावी, असा आदेश आहे. या आदेशाला झुगारुन विजापूर वेस येथील लक्ष्मी मार्केटमध्ये रविवारी फळ विक्रेते व भाजी विक्रेते हाथ गाड्यावर व खाली बसून फळे, भाजी विकत होते. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत फळे, भाजी व हातगाड्या जप्त करत कारवाई केली. या कारवाई वेळी भाज्यांचे व फळांचे नुकसान झाले.

पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत विक्रेत्यांनी मोर्चा काढत फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. गेल्या तीन महिन्यांपासून हातावर पोट असणारे विक्रते कसेबसे तरी जीवन जगत आहेत. कर्ज काढून, हाथ उसने पैसे घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत. व्यवसाय करण्यासाठी देखील रोख रक्कम हातात नाही. उधार माल घेऊन फळ व भाजी विक्री करत आहेत. त्यात असा कारवाईने आर्थिक नुकसान झाले आहे. आम्हाला कामधंदा द्या, असे म्हणत हा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी स्पष्टपणे सांगत खुलासा केला आहे की, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या होम मैदान येथे भाजी व फळ विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. लक्ष्मी मार्केट हा भाग अतिशय दाटीवटीचा भाग असून तेथे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मोर्चामधील विक्रेत्यांची समजूत काढून यापुढे भाजी व फळ होम मैदानावरच विक्री करावी अन्यथा पोलिसांना नाईलाजास्तव पुन्हा कारवाई करावी लागेल. कोरोना महामारी विरोधात लढ्यात शासनाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. सोमवारी सकाळी विक्रेत्यांची दोन-चार वरिष्ठ लोक यावेत व चर्चा करुन मार्ग काढू, असे सांगत मोर्चामधील विक्रेत्यांना परत पाठविले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रते पोलीस ठाण्यावर चालून आल्याने पोलिसांनी खबरदारी घेत गेट बंद केले होते. पोलीस ठाण्यात गर्दी होऊ नये याची काळजी घेत मोर्चास परत पाठविले.

Last Updated : Jul 7, 2020, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.