सोलापूर : भाजपचे प्रवक्ता किरीट सोमैया हे महाविकास आघाडीचे सरकार असताना नेहमी चर्चेत होते. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांविरोधात माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करत मोठमोठे घोटाळे बाहेर काढले होते. किरीट सोमैया यांची अनेकदा भाजप नेत्यांनी पाठराखण केली होती. या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे किरीट सोमैया यंदा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
चित्रा वाघ यांच्यावर काँग्रेसकडून टीका : भाजपचे प्रवक्ते किरीट सोमैया हे व्हिडीओ कॉलद्वारे चॅटिंग करत असताना, अश्लिल कृत्य केले. समोरच्या व्यक्तीने हे सर्व चॅटिंग व्हिडीओ रिकोर्ड केले. तसेच काही सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने किरीट सोमैया अडचणीत आले आहेत, असे सांगितले जाते. भाजपमधील अनेक महिला नेत्या यावर मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेसच्या महिला नेत्यांनी कडक शब्दांत किरीट सोमैयांवर टीका केली आहे.अल्पसंख्याक सेलमधील महिला नेत्या फिरदोस पटेल यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांना टार्गेट करत, उर्फी जावेदच्या कपड्यांवर बोलणाऱ्या चित्रा वाघ या किरीट सोमैया यांच्या व्हिडीओवर का बोलत नाहीत,असा सवाल उपस्थित केला आहे.
हातोडा मारून केला निषेध : काँग्रेसच्या महिला नेत्यांनी व पदाधिकऱ्यांनी एकत्रित येत मंगळवारी सायंकाळी मौलाअली चौक परिसरात, किरीट सोमैया यांचा निषेध केला. सोमैया यांच्या बॅनरला प्रतिकात्मक रित्या हातोडा मारून, पायदळी तुडवत भाजपवर टीका केली आहे.
विधिमंडळात दिसले पडसाद : भाजप नेते किरीट सोमैया यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाल्यानंतर याचे पडसाद आज विधिमंडळात दिसून आले. विधान परिषदेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा -