ETV Bharat / state

सोलापुरात शिवभोजन थाळीने गाठला एक लाखांचा टप्पा

सोलापूर जिल्ह्यात एकूण 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी 5 शहरात तर 21 ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज एकूण 3 हजार 500 थाळींचे उद्दीष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 11 हजार 8074 आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सोलापुरात शिवभोजन थाळीने गाठला एक लाखाचा टप्पा

author img

By

Published : Apr 30, 2020, 9:45 AM IST

Updated : Apr 30, 2020, 12:14 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. शहर व जिल्ह्यात 26 केंद्राच्या माध्यमातून शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना यामुळे आधार मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापुरात शिवभोजन थाळीने गाठला एक लाखांचा टप्पा

सोलापूर जिल्ह्यात एकूण 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी 5 शहरात तर 21 ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज एकूण 3 हजार 500 थाळींचे उद्दीष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 11 हजार 8074 आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा नियमित पुरवठा सुरू आहे. खुल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे सुरळीत वितरण सुरू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकाद्वारे शहरात वितरण सुरू आहे. त्यांच्याकडून सिलेंडर वितरण सुरू आहे. गॅस सिलेंडर रिफिलींग करणारे केंद्र शहरालगतच असल्याने सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये, असेही आवाहन त्यांनी केले.

Last Updated : Apr 30, 2020, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.