ETV Bharat / state

कुटुंबातील ५ सदस्यांचा अवघ्या १० दिवसांत कोरोनाने मृत्यू, १६ महिन्यांची सारा झाली पोरकी

author img

By

Published : Jun 4, 2021, 8:25 AM IST

Updated : Jun 4, 2021, 4:43 PM IST

भैय्या शेख यांचा टेंभूर्णीत पाण्याच्या टँकरचा व्यवसाय आहे. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतानाच शेख यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला हनिफ शेख यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे घरात संपर्कात असलेल्या सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर सर्वांनी उपचार सुरू केले. यातून केवळ भैय्या शेख कोरोनातून बरे झाले. तर इतर ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला.

५ जणांचा घेतला बळी
५ जणांचा घेतला बळी

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. कोरोनामुळे टेंभूर्णी गावातील भैय्या शेख यांच्या ७ सदस्यांच्या कुटुंबातील तब्बल ५ जणांचा अवघ्या १० दिवसात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे माढा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या या मृत्यू तांडवामुळे प्रशासनाचा ढिसाळपणाही उघडा पडत आहे.

टेंभूर्णी येथील रहिवासी भैय्या शेख यांच्या घरातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये वडिल हनिफ मौला शेख (६८ वर्षे) यांचा २७ एप्रिलला मृत्यू झाला. तर १ मे रोजी आई ईल्लला हनिफ शेख (६१ वर्षे) यांचा मृत्यू झाला. नंतर भाऊ इक्बाल हनिफ शेख (३१ वर्षे) आणि सावत्र आई रुक्साना हनिफ शेख (५५ वर्षे) या दोघांचा एकाच दिवशी म्हणजे ५ मे रोजी कोरोनाने बळी घेतला. भैय्या शेख यांच्या परिवारावर घाला घालणाऱ्या कोरोनाने ६ मे रोजी पत्नी अर्जिया भैय्या शेख (२४ वर्षे) यांचाही बळी घेतला. त्यामुळे अवघ्या १६ महिन्यांच्या सारा शेखला पोरकी झाली आहे.

भैय्या शेख यांचा टेंभूर्णीत पाण्याच्या टँकरचा व्यवसाय आहे. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतानाच शेख यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला हनिफ शेख यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे घरात संपर्कात असलेल्या सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर सर्वांनी उपचार सुरू केले. यातून केवळ भैय्या शेख कोरोनातून बरे झाले. तर इतर ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला.

१६ महिन्यांची सारा पोरकी झाली

भैय्या शेख यांच्या पत्नीचाही या कोरोनामुळे बळी गेला. मात्र, आई कुठे गेली म्हणून विचारणाऱ्या चिमुकल्या साराला ती उद्या येईल, अशी खोटी समजूत काढण्याशिवाय भैय्या शेख यांच्याकडे दुसरा मार्ग उरला नाही.

'ढिसाळ यंत्रणेमुळे गेले बळी' शेख यांचा आरोप

'प्रशासनाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे माझ्या कुटुंबातील 5 सदस्यांचा बळी गेला आहे', असा गंभीर आरोप शेख यांनी केला आहे. 'मात्र, या परिस्थितीते भान यांना नाही. ज्यावेळी मंत्री, आमदार, खासदार अधिकारी यांच्या घरात अशी परिस्थिती निर्माण होईल. त्या वेळेस त्यांना या कोरोनाची दाहकता समजेल', अशी भावनाही शेख यांनी व्यक्त केली आहे.

'ऑक्सिजन बेडसाठी रुग्णालयात हेलपाटे'

'वडिल बाधित आढळल्याने स्थानिक डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांना गोळ्या औषधाचा डोस सुरू होता. मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांचा अकलूजमध्ये एच.आर.सिटी काढला. त्यानुसार अनेक धावपळ केल्यानंतर बार्शीच्या सुविधा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्परतेने यंत्रणा हालली नसल्याने शरीरानेही साथ दिली नाही. यातच ते दगावले. आई, भाऊ, सावत्र आई, पत्नी चारही जणांना ऑक्सिजन बेडसाठी धावपळ करावी लागली. अथक प्रयत्नांनंतर इंदापूर, सोलापूरला बेड उपलब्धत झाले', असे भैया शेख यांनी सांगितले.

दरम्यान, भैय्या शेख व इक्बाल शेख या दोघांनी तर इंदापूरमधील रुग्णालयातील फरशीवर झोपून उपचार घेतले. भैय्या बचावले. मात्र १० दिवसात त्यांच्या कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला.

'एकही प्रतिनिधी मदतीला आला नाही'

'कोरोना रुग्ण, मृतांची आकडेवारी प्रशासन दररोजच जाहीर करत राहते. मात्र, अशी दुर्दैवी घटना कोणाच्या कुटुंबामध्ये घडू नये. यासाठी प्रशासनाने दखल घेणे गरजे आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, त्यातच मदतीची याचना करूनही तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी कामाला आला नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया भैय्या शेख यांनी दिली आहे.

हेही वाचा - बेळगावात विवाहित तरुणीची प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या

Last Updated : Jun 4, 2021, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.