ETV Bharat / state

सोलापुरात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिवसेनेची ५ मदतकेंद्रे - soalapur shivsena news

शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ठिकठिकाणी मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सेनेची पाच मदत केंद्र
author img

By

Published : Nov 15, 2019, 11:42 PM IST

सोलापूर- येथील शेतकरी अगोदर सुका आणि त्यानंतर ओल्या दुष्काळाचा बळी ठरला आहे. त्यामुळे दोन्ही दुष्काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे.

हेही वाचा- 'या' खनिजाचा राजस्थानात आढळला प्रचंड साठा; आयातीऐवजी भारत भविष्यात करणार निर्यात

शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी. यासाठी ठिकठिकाणी मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची खरी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळण्यास मदत होईल. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याची ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिली.

जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोटला शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना अडचणीच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रांची सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे सुरू आहेतच. परंतु, याची माहिती कशी भरायची, कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, हा या मदत केंद्राचा उद्देश असल्याचे जिल्हाप्रमुख वानकर यांनी सांगितले.

राज्यात सत्तेचा खेळ रंगला आहे. मात्र, या सत्तेत गुंतून न पडता शिवसेना दुष्काळात सापडलेल्या बळीराजासाठी धावून आली आहे. शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम शिवसेनेने हाती घेतले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दिले होते. त्यानुसार मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले आहे.

Intro:सोलापूर : जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आधी सुका आणि त्यानंतर ओल्या दुष्काळाचा बळी ठरला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या दोन्ही दुष्काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून जाण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे.
Body:सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी म्हणून ठिकठिकाणी मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची खरी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळण्यास मदत होईल आणि एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याची ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिलीय.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,मंगळवेढा, बार्शी,उत्तर सोलापूर आणि अक्कलकोटला शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे.याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शिवसेना अडचणीच्या काळात बळीराजाच्या पाठीशी असल्याबद्धल दिलासा दिला. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला काही दिवसांपूर्वी सुका तर आता ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रांची सुरुवात केली आहे.जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे सुरु आहेतच परंतु माहिती कशी भरायची,कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले आहे,याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या मदत केंद्रांचा उद्देश असल्याचे जिल्हाप्रमुख वानकर यांनी सांगितले. Conclusion:राज्यात सत्तेचा खेळ रंगला आहे.मात्र या सत्तेत गुंतून न पडता शिवसेना दुष्काळात सापडलेल्या बळीराजासाठी धावून आली आहे.शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत.शेतक-यांचे अश्रू पुसण्याचे काम शिवसेनेने हाती घेतले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दिले होते,त्यानुसार मदत केंद्रांची सुरुवात करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी शेवटी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.