ETV Bharat / state

Solapur Anti corruption unit: लाच मागणाऱ्या महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले

अँटी करप्शन सोलापूर युनिटने (Solapur Anti corruption unit) जिल्हा कोषागार कार्यालयात (solapur District Treasurer Office) अश्विनी देविदास बडवणे (वय 34 वर्ष,रा,सोलापूर) यांना साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे.

सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालय
सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालय
author img

By

Published : Nov 2, 2022, 10:15 PM IST

सोलापूर: ड्युटीवर असताना मृत पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबियांना पेंशनबाबत कोषागार कार्यालयातील महिला लिपिक लाच मागत होती. (female clerk asked for bribe) त्यांचे कुटुंबीय फॅमिली पेंशनसाठी वर्षभरापासून कोषागार कार्यालयात हेलपाटे मारत होते. अखेर लाच मागणाऱ्या महिला लिपीकावर कारवाईची कुऱ्हाड पडली आहे. अँटी करप्शन सोलापूर युनिटने (Solapur Anti corruption unit) जिल्हा कोषागार कार्यालयात (solapur District Treasurer Office) अश्विनी देविदास बडवणे (वय 34 वर्ष,रा,सोलापूर) यांना साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. या कारवाईमुळे कोषागार कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलीस निरीक्षकाचा ड्युटीवर असताना मृत्यू: गेल्या वर्षी तक्रारदार यांच्या वडीलांचा पोलीस निरीक्षक या पदावर असताना मृत्यू झाला होता. मात्र कोषागार कार्यालयातील अश्विनी बडवणे या फॅमिली पेंशनची मंजूर करूण देण्यासाठी 6 हजार रुपये लाच मागत होत्या. पोलीसांच्या कुटुंबियांनी बडवणे यांना 1500 रुपये दिले होते.

साडेचार हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले: तक्रारदार पोलीस कुटुंबियांनी याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा लावला. साडेचार हजार रुपयांची लाच घेताना अश्विनी बडवणे या महिला लिपिकास रंगेहात पकडले. या कारवाईत अँटी करप्शनचे मुख्य अधिकारी गणेश कुंभार यांचा सहभाग होता. याबाबत अधिक माहिती देताना गणेश कुंभार यांनी सांगितले की, कोषागार कार्यालयात निवृत्त सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची सरकारी कामे असतात. या ठिकाणी नेहमीच पैशांची मागणी केली जाते. आता या कारवाईमुळे कोषागार कार्यालयातील सरकारी कामे लवकर होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.