ETV Bharat / state

'मातोश्री' साखर कारखान्याकडू शेतकऱ्यांचे पैसे थकीत, शेतकऱ्यांनी पुकारले आंदोलन - farmers called for agitation

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज दुपारी काँग्रेस भवनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्यात गेल्या वर्षी अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस दिले होते. मात्र, गेल्या वर्षीपासून आजतागायत एफआरपीची रक्कम मिळाली नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, दिवसभर काँग्रेस भवनासमोर शेतकरी बसल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते काँग्रेस भवन येथे फिरकलेही नाहीत.

'मातोश्री' साखर कारखान्याकडू शेतकऱ्यांना थकीत पैसे मिळेनात, शेतकऱ्यांनी पुकारले आंदोलन

author img

By

Published : Oct 28, 2021, 11:58 AM IST

सोलापूर - माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज दुपारी काँग्रेस भवनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्यात गेल्या वर्षी अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस दिले होते. मात्र, गेल्या वर्षीपासून आजतागायत एफआरपीची रक्कम मिळाली नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा महाविकास आघाडी सरकारने राज्यभर निषेध नोंदविला. पण महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्यासाठी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आस्था दाखवली पाहिजे अशी मागणी करत बुधवारी दुपारी सिद्धाराम म्हेत्रे यांना आंदोलकांनी लक्ष केले. दिवसभर काँग्रेस भवनासमोर शेतकरी बसल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते काँग्रेस भवन येथे फिरकलेही नाहीत.

माहिती देताना आंदोलक

मातोश्री साखर कारखान्यावर कारवाई करावी

शेतकऱ्यांना उसाची बिलं गाळप झाल्यानंतर साखर कारखान्याने पंधरा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. तसा कायदा देखील आहे. पण हा कायदा पायदळी तुडवत वर्ष लोटले तरीही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. जिल्हाधिकारी यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या साखर कारखान्यावर कडक कारवाई करत 2021-2022 ला ऊस गाळपाचा परवाना न देता आर. आर. सी.( rrc )काढून कारखाना जप्त करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

काँग्रेस भवनसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडले-

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शेतकरी आंदोलना दरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. महाविकास आघाडी सरकारने राज्यभर याचा निषेध करत महाराष्ट्र राज्य बंद केले होते. महाविकास आघाडी मधील नेत्यांना लाखीमपूर येथील शेतकऱ्यांबाबत जिव्हाळा आहे. पण महाराष्ट्र राज्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत जिव्हाळा नाही का? त्यांच्या अडीअडचणी कधी सोडवणार असा सवाल उपस्थित करत शेतकरी बांधवानी काँग्रेस भवनासमोर ठिय्या मांडला होता.

हेही वाचा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.