ETV Bharat / state

सोलापुरात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Aug 22, 2019, 7:07 PM IST

बार्शी तालुक्यातील नारी व परिसरातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.

सोलापुरात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

सोलापूर - बार्शी तालुक्यातील नारी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यामुळे आज (गुरुवारी) विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. खरीप हंगामातील पिक विमा भरुन देखील भरपाई मिळत नसल्यामुळे हे आंदोलन केले, अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन

बार्शी तालुक्यात खरीपाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१८ या वर्षातील खरीप हंगामासाठीचा पीक विमा भरलेला आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील खरीपाचे पीक पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काहीच आले नाही. त्यामुळे शासन दरबारी पंचनामे देखील झाले. पंचनामे झाल्यानंतर शासनाने जाहीर केलेली मदत तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मिळाली. शासनाच्या मदतीसोबत विमा कंपनीचीही मदत मिळाली. मात्र, नारी व परिसरातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.

मागील ३ महिन्यापासून हे शेतकरी विमा कंपन्याच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कंपनीकडून या शेतकऱ्यांनी कोणतीच दाद दिली जात नाही. शेतकऱ्यांनी विमा भरताना जो अर्ज भरला त्यात चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, वास्तविक पाहता विमा भरताना शेतकऱ्यांकडून चूक झाली असली तरीही मागील अनेक महिन्यापासून हे एकमेव कारण पुढे करुन विमा देण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी हे त्यांनी भरलेल्या विम्याच्या पोटी नुकसान भरपाई मागत आहेत. पण विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांचे समाधान करुन मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांना संभ्रमात ठेऊन विनाकारण चकरा मारायला लावत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयातच आपला ठिय्या मांडला. तसेच जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. सध्या विमा कंपनीकडून आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

Intro:mh_sol_01_farmer_andolan_7201168
विमा कार्यालयातच शेतकऱ्यांचा ठिय्या
पैसे भरूनही खरीपाचा विमा मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त
सोलापूर-
पिक विम्याची रक्कम मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. बार्शी तालूक्यातील नारी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी खऱीप हंगामातील पिक विमा भरून देखील नूकसान भऱपाई मिळत नसल्यामुळे संतंप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले.Body:सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालूक्यात खरीपाची पिक मोठ्या प्रमाणात घेतली जातात. बार्शी तालूक्यातील शेतकऱ्यांनी २०१८ या वर्षातील खऱीप हंगामासाठीचा पिक विमा भऱलेला आहे. मागील वर्षी दूष्काळी परिस्थितीमुळे तालूक्यातील खरीपाची पिक पूर्णपणे गेली. खरीपाची पिक गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काहीच आले नाही. शासन दरबारी पंचनामे देखील झाले. पंचनामे झाल्यानंतर शासनाने जाहीर केलेली मदत तालूक्यातील काही शेतकऱ्यांना मिळाली. शासनाच्या मदतीसोबत विमा कंपनीचीही मदत मिळाली मात्रा नारी व परिसरातील शेतकऱ्यांना विमा कंपनीक़डून नूकसान भरपाई मिळालेली नाही.

मागील तीन महिन्यापासून हे शेतकरी विमा कंपन्याच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र कंपनीकडून या शेतकऱ्यांनी कोणतीच दाद दिली जात नाही. शेतकऱ्यांनी विमा भरतांना जो अर्ज भरला आहे त्या अर्जामध्ये चूकीची माहिती दिली असल्याचे कारण पूढे करत शेतकऱ्यांना नूकसान भरपाई दिली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. वास्तविक पाहता विमा भऱतांना शेतकऱ्यांकडून चूक झाली असली तरीही मागील अनेक महिन्यापासून हे एकमेव कारण पूढे करूण विमा देण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी हे त्यांनी भरलेल्या विम्याच्या पोटी नूकसान भरपाई मागत असतांना विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांचे समाधान करून मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांना संभ्रमात ठेऊन विना कारण चकरा मारायला लावण्यात येत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी विमा कंपनीच्या कार्य़ालयताच आपला ठिय्या मांडला आणि जो पर्यंत नूकसान भऱपाई मिळत नाही तोपर्य़ंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका घेतली होती. विमा कंपनीकडून आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.