सोलापूर - पिंपळखुटे येथील शेतकऱ्याच्या मुलाची डीआरडीओसाठी शास्त्रज्ञ म्हणुन निवड झाली आहे. उत्तरेश्वर देविदास कचरे असे या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - 'कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी मुंबई-पुण्यात लॅबची संख्या वाढविणार'
पिंपळखुटे येथील देविदास आणि सावित्री कचरे यांच्या पोटी जन्माला आलेल्या उत्तरेश्वरने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी डीआरडीओच्या (भारतीय संरक्षण आणी संशोधन केंद्र) परीक्षेत उर्तिण होत वर्ग एकच्या शास्त्रज्ञ पदावर मजल मारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत १५ डिसेंबर ला परीक्षा घेण्यात आली होती. ही परिक्षा त्याने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.
अभियांत्रिकी पदवी संपादन करताच उत्तरेश्वरला कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी देखील चालून आली, मात्र ती नाकारत त्याने शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न अथक प्रयत्नाच्या जोरावर पुर्ण केले आहे. गरीबीचं जीणं जगत पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास असलेले उत्तरेश्वरचे आई वडील पिंपळखुटे गावात शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. तर भाऊ परमेश्वर फ्रिज,एसी,फॅन दुरूस्ती ची कामे करतो.
जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक तर न्यु इंग्लिश शाळेत उत्तरेश्वरचे शिक्षण झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उत्तरेश्वरला पुण्याच्या दिशा परिवार समाजसेवी संस्थेने मदतीचा हात दिला होता. उत्तरेश्वरने मिळवलेल्या या यशामुळे पिंपळखुटे सह माढा तालुक्याचे नाव देशात मोठे केले आहे. उत्तरेश्वरबद्दल कळताच, गावकरऱयांनी त्याचे घोड्यावरुन मिरवणुक काढत त्याचे जंगी स्वागत केले.
"देशाच्या सुरक्षा यंत्रणेत जाण्याचं मला शालेय दशेपासुन ध्येय लागलं होतं. देशासाठी सेवा करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी मोठं भाग्यच आहे. आई वडिल आणि भावाने प्रोत्साहन दिले. आणि मी अभ्यासात सातत्य ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टांची जाण ठेवावी" असे उत्तरेश्वरने सांगितले.
"आमच्या कष्टाची जाण ठेवत त्याचे फळ आम्हांला उत्तरेश्वर मिळवुन दिले आहे. आमच्या कुटूंबाला आणि गावाला खऱ्याअर्थाने ओळख मिळवुन दिली. यामुळे आम्हाला खुप आनंद झाला असल्याच्या भावना आई वडील आणि भावाने व्यक्त केल्या".