ETV Bharat / state

तरुण शेतकऱ्याचा देशी जुगाड, कल्पनाशक्तीतून साकारली ई - बाईक

जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे, सर्व सामान्य जनतेला आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे, ग्राहकांचा ओढा हा ई - बाईककडे असल्याचे दिसून येते. यातच सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने देशी जुगाड करत भंगारातील साहित्य वापरून ई - बाईक तयार केली आहे.

Deepak Naik Navare E bike Sohale
दीपक नवरे ई बाईक
author img

By

Published : Mar 20, 2022, 8:05 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे, सर्व सामान्य जनतेला आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे, ग्राहकांचा ओढा हा ई - बाईककडे असल्याचे दिसून येते. यातच सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने देशी जुगाड करत भंगारातील साहित्य वापरून ई बाईक तयार केली आहे. या ई बाईकला ना पेट्रोल, ना काही तास चार्जिंग करण्याची गरज भासते. अफलातून कल्पनेतून मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावचे तरुण शेतकरी दीपक नाईक नवरे यांनी ही बाईक तयार केली आहे. ही ई - बाईक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली आहे.

माहिती देताना दीपक नवरे

हेही वाचा - Water aerodrome project at Ujjani : उजनी धरणातून विमानसेवा सुरू होणार

भंगारातील साहित्य ते ई बाईकचा प्रवास

जागतिक पातळीवर वाढते प्रदूषण हा विषय चिंतेचा होत चालला आहे. त्यातच वाहनांच्या इंधनामधून हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे, जगाला आता एका पर्यावरणपूरक वाहनाची गरज निर्माण झाली आहे. त्यातच ई - वेस्ट ही कचऱ्याची समस्याही मोठी आहे. तरुण शेतकरी दीपक नाईक नवरे यांनी ई - साहित्यांचा योग्य वापर करून ई - बाईक तयार केली. इलेक्ट्रिक वस्तूंची जुळवाजुळव केली आणि त्यातील साहित्य हे आपल्या देशी जुगाडातून बाईकसाठी वापरले. बाईकलाही कोणत्याही इंधनाची गरज भासत नाही, असा दावा दीपक नवरे यांनी केला आहे.

कोरोना परिस्थितीत इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती

गेल्या दोन वर्षांपासून जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्या काळात सर्व राज्य बंद ठेवण्यात आली होती. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात दीपक नाईक नवरे यांनी आपल्या चिकित्सक वृत्तीचा वापर केला. त्यांनी पंढरपूर येथील महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक आयआयटी कोर्स पूर्ण केला होता. त्यानंतर दीपक यांनी घरातील इलेक्ट्रिक बोर्ड, इलेक्ट्रिकल बॅटरी, तसेच जुन्या इलेक्ट्रिक साहित्यांचा वापर केला. इलेक्ट्रिक साहित्याची जुळवाजुळव करत इलेक्ट्रिक बाईक त्यांनी बनवली आहे. त्यातील काही वस्तू बाहेरूनही मागवण्यात आल्या. ही गाडी आपोआप चार्जिंग होते, असा दावा दीपक नवरे यांनी केला आहे. याला खर्च आला नाही, अशा अनोख्या इलेक्ट्रॉनिक बाईकमुळे दीपक हे सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहेत. या ई - बाईकचे अद्याप पेटेंट घेतलेले नाही. जर पेटेंट मिळाले तर ती मोठी क्रांती ठरू शकते.

हेही वाचा - Liquor Seized Solapur : सोलापुरात राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; 76 लाखांचा मद्यसाठा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.