ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे रस्ते सोडून इतर सर्व रस्ते 1 जून पर्यंत बंद; पोलीस अधीक्षकांची माहिती - Solapur district road close Tejasvi Satpute information

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूने जोर धरला आहे, त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक जून पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील अंतर्गत 199 रस्त्यांपैकी तब्बल 173 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहेत.

Breaking News
author img

By

Published : May 16, 2021, 6:42 PM IST

सोलापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूने जोर धरला आहे, त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक जून पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील अंतर्गत 199 रस्त्यांपैकी तब्बल 173 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. 1 जूनपर्यंत हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

हेही वाचा - विठ्ठल मंदिर समितीकडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप

जिल्ह्यामध्ये एक जून पर्यंत संचारबंदी

राज्य सरकारने एक जून पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी सोलापूर जिल्ह्यातही असणार आहे. मात्र, यामध्ये फक्त किराणा व भाजीपाला विक्रीला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे, खरेदीच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाचा धोकाही वाढू शकतो, या पार्श्‍वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना चाचणी बंधनकारक

सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही बाधित आणि मृत्यूची संख्या वाढत असल्याचेच दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही कडक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शहरात येणार्‍यांची आता कोरोना चाचणीही बंधनकारक करण्यात आली आहे.

केवळ 26 रस्ते मार्ग चालू असणार

येत्या 1 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार्‍या रस्त्यांमध्ये पंढरपूर तालुक्यातील 44 रस्ते, सांगोला शहरातील 28 रस्ते, माळशिरस तालुक्यातील 38 रस्ते, अक्कलकोट तालुक्यातील 21 रस्ते, करमाळा विभागातील 46 रस्ते, सोलापूर विभागातील 17 रस्ते, मंगळवेढा तालुक्यातील 51 रस्ते, बार्शी तालुक्यातील 24 रस्त्यांचा समावेश आहे. केवळ 26 रस्त्यांवर वाहतूक चालू ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा - बीडमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत 'फ्री स्टाइल' हाणामारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.