सोलापूर - करमाळा तालुक्यातील मलवडी येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने रेवणनाथ कोंडलकर या शेतकऱ्याची द्राक्षाची बाग भुईसपाट झाली असून सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - शेअर बाजारात ८९३.९९ अंशांनी पडझड; गुंतवणूकदारांचे बुडाले ३.८५ लाख कोटी
वादळी वाऱ्यामुळे मलवडी येथील रेवणनाथ कोंडलकर या शेतकऱ्याची दोन एकर द्राक्षाची बाग भुईसपाट झाली असून यामध्ये या शेतकऱ्याचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही दिवसानंतर द्राक्ष बाजारात विक्रीसाठी येणार होते. अतिशय कष्टाने बाग जोपासली होती. त्यामुळे मजबुत स्थितीमध्ये द्राक्षाचे घड होते. या घडाचे वजनही तुलनेने जास्त झाले होते. त्यात वादळी वारे सुटल्याने ही बाग भुईसपाट झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. बागेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून शेतकऱ्याने कर्ज घेतलेले आहे. द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्यामुळे ते कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.
हेही वाचा - महा'अर्थ' संकल्प : लालपरी ताफ्यात येणार 1600 नवीन बस, वायफायचीही सुविधा