ETV Bharat / state

सोलापुरात विधवा महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून छळ, गुन्हा दाखल

एका विधवा महिलेशी प्रेमसंबंध जुळवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना सोलापुरात समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीसह त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

domestic violence with Widow in solapur
जोडभावी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Aug 14, 2020, 9:46 AM IST

सोलापूर - एका विधवेसोबत प्रेम संबंध जुळवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेचा गर्भपात केला आणि लग्न केले. लग्नानंतर आई-वडीलांच्या सोबत मिळून महिलेला त्रास दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित शितोळे, वंदना शितोळे व ईश्वर शितोळे (सर्व रा. वैदवाडी, प्रियांका चौक, सोलापूर), अशी आरोपींची नावे आहेत. या तीन जणांविरोधात भा.द.वि. 498 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अभिजित शितोळे याला एक विधवा महिला आवडली. ही विधवा एका खासगी संस्थेत नोकरी करत होती. पहिल्या पतीपासून त्याला एक मुलगी देखील होती. अभिजित शितोळे याने महिलेसोबत ओळख वाढवली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. महिलेने अभिजितला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभिजितने काही एक ऐकले नाही. तिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. दोघेही वर्ष भर एकत्रच राहिले. यादरम्यान दोघात शारीरिक संबंध निर्माण झाले आणि महिला गर्भवती राहिली. त्यावेळी तिने अभिजितकडे लग्नाचा हट्ट धरला. मात्र, अभिजितने रागात महिलेला मारहाण केली. महिलेच्या पोटावर लाथ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी गर्भपात केल्यास मी तुझ्याशी लग्न करेल, अशी अट अभिजितने महिलेसमोर ठेवली. मात्र, तिला पोटावर मार लागण्याने तिचा गर्भपात झाला.

अभिजित शितोळे याने अखेर 28 नोव्हेंबर 2019 रोजी पीडितेशी लग्न केले. एक-दोन महिने आनंदाने संसार केल्यानंतर अभिजित पत्नीला घेऊन आई-वडिलांकडे राहावयास गेला. अभिजितच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली. अभिजितची आई वंदना शितोळे व वडील ईश्वर शितोळे हे दोघे पीडित महिलेला मारण्यासाठी अंगावर धावून येत होते. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देत होते. काही दिवसांनी पती अभिजित देखील आई वडिलांसारखा वागू लागला. तिन्ही आरोपींनी पैशाची मागणी करत पीडितेचा छळ केला. शेवटी १२ ऑगस्टला पीडित महिलेने रात्री सव्वा दहा वाजता जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गाठले व सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कौटुंबिक हिंसाचार भा. द.वि. 498 -अ प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला. याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कानडे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.