ETV Bharat / state

उमेदवार संत असला पाहिजे म्हणून सुधाकरपंतांना उमेदवारी - देवेंद्र फडणवीस - सुधाकरपंत परिचारक सोलापूर

मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे. म्हणूनच येथील उमेदवारही संत असला पाहिजे. यासाठी सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे

देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 10, 2019, 6:30 PM IST

सोलापूर - मंगळवेढा येथे भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, 'मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे. म्हणूनच येथील उमेदवारही संत असला पाहिजे. यासाठी सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली' असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

काँग्रेस राष्ट्रवादीचे म्हणजे 'खोटे बोल पण रेटून बोल' - फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 'येत्या २४ तारखेला आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते थकले असल्याने सांगत आहेत. ते दोन्ही काँग्रेसचे विलीकरण होणार म्हणून बोलत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने आत्ताच हार मानली आहे. त्यांनी असा जाहीरनामा दिला आहे की, आपण निवडून येत नाही म्हणून खोटे आश्वासने दिली आहेत. सध्या काँग्रेस राष्ट्रवादीचे वागणे म्हणजे 'खोटे बोल पण रेटून बोल' असे असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा... पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे

महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी आपले आशिर्वाद हवे आहेत - फडणवीस

गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारचा कारभार जनतेने पहिला आहे. त्यामुळे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे. दिशाभूल करणे, खोटी आश्वासने देणे यापलीकडे गेली १५ वर्ष आघाडीच्या पक्षांनी काहीच केले नाही. आम्ही गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली, वेग वेगळी मदत मिळवून दिली. जो पर्यंत जनावरांना चारा उपलब्ध होत नाही तो पर्यंत चारा छावण्या सुरू ठेवल्या. शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या शेतीलाही पाणी दिले. दुष्काळातही शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला. मंगळवेढ्यात आम्ही केलेल्या कामामुळेच शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. पुराचे सगळे पाणी समुद्रात वाहून जाते, तेच पाणी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागासाठी देण्यासाठी योजना आखली जात आहे. नीरा कृष्णा स्थिरीकरण तयार केले. आत्ता दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आलो आहे. या सगळ्या योजना पूर्ण करण्याचे काम सुधाकरपंतांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा... पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा भाजप कार्यालयासमोरच गोंधळ

आमचे सरकार हे सर्व सामान्यांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे सरकार - फडणवीस

गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्ते बनविले गेले. पाच वर्षात गरिबांना घरे बांधून दिले पाणी मिळवून दिले. तसेच २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील एकही गरीब घरापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक गरिबांना घर,पाणी, लाईट,गॅस देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. प्रत्येक गरिबांच्या घराचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दिले आहे. बचत गटांना जोडण्याचे काम करून त्यांना बिनव्याजी कर्ज मिळवून दिले. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांक पर्यंत आणण्याचे काम केले. आरोग्य, शिक्षण अशा योजना गरिबांना मिळवून दिला. हजारो बालकांचे ऑपरेशन आरोग्य योजनेतून मोफत झाले आहेत. हे सर्व सामान्यांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे सरकार आहे. संत बसवेश्वर, चोखामेळा यांचे स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला नेणार असून सुधाकरपंतांना निवडून द्या येथील सर्व योजना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

हेही वाचा... 'मधुकर चव्हाण' यांच्या आमदारकीला मधुकर चव्हाणांचाच खोडा!​​​​​​​

शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी सैनिकांना ताब्यात घेतले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना मतदारसंघ अध्यक्ष राहुल घुले यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासमवेत शहरातील काही प्रमुख माजी सैनिकांना देखील ताब्यात घेतले होते.

Intro:मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे म्हणून इथला उमेदवार संत असला पाहिजे म्हणून सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथील सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.Body:मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की,ज्या संख्येने जनता उपस्थित आहे.२४ तारखेला फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते थकले असल्याने सांगत आहेत. ते दोन्ही काँग्रेस चे विलीकरण होणार म्हणून बोलत आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादी ने आत्ताच हार मानली आहे.असा जाहीरनामा दिला आहे की आपण निवडून येत नाही म्हणून खोटे अवश्वान दिली आहेत. तेंच म्हणजे खोट बोल आणि रेटून बोल म्हणी प्रमाणे सांगत आहेत.

गेल्या पाच वर्षातील कारभार जनतेने पहिला आहे.त्यामुळे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे.दिशाभूल करणे खोटी आश्वासन देने यापलीकडे गेली १५ वर्ष यांनी काहीच केलं नाही.गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली,वेग वेगळी मदत मिळवुन दिली.

जो पर्यंत जनावरांना चारा उपलब्ध होत नाही तो पर्यंत चारा छावण्या सुरू ठेवल्या. शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या शेतीलाही पाणी दिले.दुष्काळातही शेतकऱ्यांना दिलासा मिळवुन दिला.मंगळवेढ्यात आम्ही केलेल्या कामामुळेच शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे.पुराचे सगळे पाणी समुद्रात वाहून जाते तेच पाणी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागासाठी देण्यासाठी योजना आखली जात आहे.नीरा कृष्णा स्थिरीकरण तयार केले.

आत्ता दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आलो आहे.या सगळ्या योजना पूर्ण करण्याचे काम सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्ता बनविला.गेल्या पाच वर्षात गरिबांना घरे बांधून दिले पाणी मिळवून दिले.

२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील एक गरीब घरापासून वंचित राहणार नाही.प्रत्येक गरिबांना घर,पाणी, लाईट,गॅस देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे.प्रत्येक गरिबांच्या घराचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दिले आहे.बचत गटांना जोडण्याचे काम करून त्यांना बिनव्याजी कर्ज मिळवून दिले.देशात महाराष्ट्र पहिल्या नंबर पर्यंत आणण्याचे काम केले.

आरोग्य, शिक्षण अशा योजना गरिबांना मिळवून दिला.हजारो बालकांचे ऑपरेशन आरोग्य योजनेतून मोफत झाले आहेत.हे सामान्यांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे सरकार आहे.संत बसवेश्वर,चोखामेळा यांचे स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला नेणार असून सुधाकरपंतांना निवडून द्या येथील सर्व योजना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी सैनिकांना ताब्यात घेतले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटना मतदारसंघ अध्यक्ष राहुल घुले यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासमवेत शहरातील काही प्रमुख माजी सैनिकांना देखील ताब्यात घेतले होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.