ETV Bharat / state

बा विठ्ठला राज्यावरील कोरोनाचे संकट दूर कर, अजित पवारांचे पांडुरंगाचरणी साकडे

बा विठ्ठला राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर, बाजारात कोरोनाची लस लवकर येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाचरणी घातले आहे.

महापूजेवेळचे छायाचित्र
महापूजेवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Nov 26, 2020, 5:48 AM IST

Updated : Nov 26, 2020, 6:58 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - बा विठ्ठला राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर, कोरोनाची लस लवकर येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांसह मानाचे वारकरी भोयर दाम्पत्यांच्या हस्ते एकादशीनिमित्त पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उपस्थित होते.

बोलताना अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच राज्यातील गोरगरीब, बारा बलुतेदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच आषाढीनंतर कार्तिकी यात्रेला जी परंपरा आहे, ती यात्रा खंडित झाली आहे. वारकऱ्यांना वारीमध्ये येता आले नाही, त्यांनी घरामध्ये बंधने पाळून ही वारी केली. या दोन्ही वारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाद होण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, अधिकारी व वारकरी संप्रदायातील काही सदस्यांच्या समंजस भूमिकेमुळे हा वाद टाळता आला. आषाढीवारी दरम्यान पंढरपूर नगर पालिका प्रशासनाला पाच कोटीचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्तता झाली नव्हती. मात्र, नगराध्यक्ष साधना भोसले यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

बळीराजाला संकटातून बाहेर काढ

राज्यातील शेतकरी कधी दुष्काळामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे अडचणीत आला आहे. बळीराजाला या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तसेच राज्यांमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याचे बळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला द्यावे, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणी मातेकडे अजित पवार यांनी केली.

ज्या पद्धतीने पंढरपूरचा विकास व्हायला हवा होता, त्या पद्धतीने झाला नाही

पंढरपूर येथील चंद्रभागा पात्रातील कुंभार घाट दुर्घटनेतील अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला दोष देता येणार नाही. चौकशीनंतर मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यायाचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. पंढरपुरात होणाऱ्या विकासा बाबतीत बोलताना अजित पवार म्हणाले, ज्या पद्धतीने पंढरपूरचा विकास व्हायला हवा होता त्याप्रमाणे पंढरपूरचा विकास होत नाही. चंद्रभागा नदीपात्रातील कुंभार घाट दुर्घटना असेल किंवा पंढरपूर मधील घरकुल योजना असेल. यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीचा तुटवडा होताना दिसत आहे. त्यावर अजित पवारांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पालकमंत्र्यांना लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

सध्या टाळेबंदी करण्याची इच्छा नाही

सध्या देशात आणि राज्यात कोरोना परिस्थिती वाढत आहे. ती वाढू नये म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी, सध्या तरी राज्य सरकारला कोणत्याही प्रकारची टाळेबंदी राज्यात करण्याची इच्छा नाही. गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यातील जनतेने टाळेबंदीच्या काळात हालपेष्टा भोगल्या आहेत. तसेच कोरोना योद्धे म्हणून काम करणारे संकटात सापडले आहेत. राज्य व केंद्र सरकारने ज्यावेळी नागरिकांना आव्हान केले त्यावेळी नागरिकांनी उत्तम प्रकारे सरकारला साथ दिली आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

हेही वाचा - कार्तिकी एकादशी निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास

Last Updated : Nov 26, 2020, 6:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.