ETV Bharat / state

Live Updates : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी - देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी

deglur byelection result LIVE
deglur byelection result LIVE
author img

By

Published : Nov 2, 2021, 6:45 AM IST

Updated : Nov 2, 2021, 5:30 PM IST

16:55 November 02

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. भाजपच्या सुभाष साबणेंना अंतापूरकर यांनी पराभूत केले आहे.

15:52 November 02

सव्वीसाव्या फेरीनंतर ️काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर

1) जितेश रावसाहेब अंतापूरकर(इंडियन नॅशनल कॉग्रेस) -97157 मते

2) सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) - 59031 मते

3) उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) - 10466 मते

14:25 November 02

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विसाव्या फेरीनंतर 27,763 मतांनी आघाडीवर

विसावी फेरी

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर

1 ) जितेश रावसाहेब अंतापूरकर  (इंडियन नॅशनल कॉग्रेस)  :-  74821

2)  सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 47058

3)  उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 8019

13:45 November 02

१८ व्या फेरी अखेर काँग्रेस आघाडीवर

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर १८ व्या  फेरी अखेर २३८७८ मताने आघाडीवर

13:34 November 02

सलग सोळाव्या फेरीत काँग्रेस आघाडीवर

️काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर

1) जितेश रावसाहेब अंतापूरकर (कॉग्रेस) :-  60116

2) सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 39034

3) डॉ. उत्तम रामराव इंगोले  (वंचित बहुजन आघाडी) :- 6388

13:31 November 02

पंधराव्या फेरीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 19180 मतांनी आघाडीवर

पंधरावी फेरी

1 )श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (कॉग्रेस)  :-  56409

2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे  (भारतीय जनता पार्टी) :- 37229

3) श्री. उत्तम रामराव इंगोले - (वंचित बहुजन आघाडी) :- 5794

12:24 November 02

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी अखेर ️काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

काँग्रेस- जितेश अंतापूरकर - 40523

भाजप- सुभाष साबणे - 27943

वंचित- डॉ. उत्तम इंगोले - 4047

12:19 November 02

काँग्रेसची घोडदौड सुरुच, अंतापूरकर दहाव्या फेरी अखेरही आघाडीवर

दहाव्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

(काँग्रेस) जितेश अंतापूरकर - 36592

(भाजप) सुभाष साबणे - 25623

(वंचित) डॉ. उत्तम इंगोले - 3560

12:09 November 02

मतमोजणी ठिकाणी कडेकोट बंदोबस्त

मतमोजणी ठिकाणी कडेकोट बंदोबस्त

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली. सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कक्षातून काढण्यात आली. मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

11:57 November 02

कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

नवव्या फेरीतही काँग्रेस आघाडीवर 

(काँग्रेस) जितेश अंतापूरकर - 33068

(भाजप) सुभाष साबणे - 22486

(वंचित) डॉ. उत्तम इंगोले - 3022

11:51 November 02

आठव्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10102 मतांनी आघाडीवर

उमेदवार आणि प्रत्येक फेरीला मिळालेले मतदान 

जितेश अंतापूरकर (काँग्रेस) - 4216+ +3078+3418+3788+3747+4085+3044+3999

सुभाष साबणे (भाजपा) -  2592+2409+2447+2495+2134+2487+2600+2709

डॉ. उत्तम इंगोले (वंचित) - 320+449+104+352+280+335+449+381

11:49 November 02

सातवी फेरी

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर आहेत.

11:31 November 02

काँग्रेस उमेदवार अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

️सहावी फेरी

काँग्रेस - जितेश अंतापूरकर - 22332

भाजप - सुभाष साबणे - 14564

वंचित - डॉ. उत्तम इंगोले - 1838

11:14 November 02

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर पाचव्या फेरी अखेर 6170 मताने आघाडीवर

पाचवी फेरी

१.जितेश अंतापुरकर (काँग्रेस) - ३७४७

२.सुभाष साबणे (भाजप) - २१३४

३.डॉ उत्तम इंगोले (वंचित) - २८०

11:12 November 02

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर चौथ्या फेरी अखेर ४५५७ मतानी आघाडीवर

चौथ्या फेरीतील मतदान 

१.जितेश अंतापुरकर (काँग्रेस) - ३७८८

२.सुभाष साबणे (भाजप) - २४९५

३.डॉ उत्तम इंगोले (वंचित) -३५२

11:07 November 02

महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर आघाडीवर

तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 3264 ने आघाडीवर

१.जितेश अंतापुरकर (काँग्रेस) - 10712

२.सुभाष साबणे (भाजप) - 7448

३.डॉ उत्तम इंगोले (वंचित) - 873

10:36 November 02

दुसऱ्या फेरीतही काँग्रेस आघाडीवर

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर

१.जितेश अंतापुरकर (काँग्रेस) - 3078

२.सुभाष साबणे (भाजप) - 2409

३.डॉ उत्तम इंगोले (वंचित) - 449

09:35 November 02

पहिल्या फेरीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 1624 आघाडीवर

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणी

फेरी क्रम.–1
 
१.जितेश अंतापुरकर (काँग्रेस) - 4216

२.सुभाष साबणे (भाजप) - 2592

३.डॉ उत्तम इंगोले (वंचित) - 320

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 1624 आघाडीवर

09:14 November 02

कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी

देगलूर - बिलोली विधानसभा पोट निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त

देगलूर विधानसभा पोटणीवडणुकीची  मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली. सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कक्षातून काढण्यात आली.

मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

08:04 November 02

मतमोजणीला सुरूवात

देगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

07:41 November 02

एकूण 30 फेऱ्या होणार

12 उमेदवार रिंगणात
12 उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल असून या निकालाकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि वंचितच्या उमेदवारांसह बारा उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात होणार असून एकूण 30 फेऱ्या होणार आहेत.

12 उमेदवार रिंगणात...!

कॉंग्रेसचे या भागातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे येथील पोटनिवडणुक होत आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर तर भाजपाकडून सुभाष साबणे व वंचितकडून उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. महाविकास आघाडीचे मंत्र्यासह अनेक नेते गण प्रचारात उतरले होते. तर शिवसेनेतून भाजपावासी झालेले सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते ठाण मांडून होते. वंचितच्या उमेदवार उत्तम इंगोले यांच्यासाठीही बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या स्वतः लक्ष्य घातले होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून या निवडणुक निकालाकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.

06:24 November 02

Live Updates : विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी

देगलूर पोटनिवडणूकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.९२ टक्के मतदान झाले. निवडणुकीत ९४२२७ पुरुष मतदार तर ८७५२३ स्त्री मतदार असे एकूण १लाख ८१ हजार ७५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

नांदेड - संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघात भाजपा (BJP) महाविकास आघाडी, (Mahavikas Aghadi) वंचितच्या उमेदवारात चुरस निर्माण झाली. महाराष्ट्रातील देगलूर पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची लढत असून भाजपाने सुभाष साबणे आणि काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. 

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत 1 लाख 54 हजार 92 पुरुष मतदार, तर 1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान मतदान असल्यामुळे या भागात सर्व कार्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. 

या पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती व्हावी यासाठी भाजपाने आपला पूर्ण जोर लावला होता. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, केंद्रीयमंत्री भागवत खुबा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. तर काँग्रेसचा गड म्हणणाऱ्या महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवार, मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले, धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे यांच्या सभांच्या तोफा धडकल्या होत्या. आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघ पोटनिवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस, भाजपा व वंचित आघाडी अशी तिहेरी आहे.

Last Updated : Nov 2, 2021, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.