सोलापूर - पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज रविवारी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाकडून रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेतली, तसेच कोरोनाबाधितांशी संवाद देखील साधला. रुग्णांना रुग्णालयाकडून चांगल्या सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, या पार्श्वभूमीवर भरणे यांनी रुग्णालयाला भेट दिली.
पालकमंत्र्यांनी अचानक रुग्णालयाला भेट दिल्याने, रुग्णालय प्रशासनाची काही काळ धावपळ उडली. यावेळी रुग्णालय प्रशासनातील महत्त्वांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान दत्तात्रय भरणे यांनी पीपीई कीट घालून, कोरोना वार्डमध्ये जात रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयाच्या वतीने त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती घेतली.
'रुग्णांना चागल्या प्रकारच्या सुविधा मिळत आहेत'
दरम्यान रुग्णालयाकडून रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. रुग्णांनी सुविधांबाबत समाधान व्यक्त केल्याची प्रतिक्रिया भरणे यांनी रुग्णांच्या भेटीनंतर दिली.
हेही वाचा - कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करून रुग्णांवर तत्काळ उपचार करा, अजित पवारांच्या सूचना