ETV Bharat / state

जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही - Oxygen bed's in solapur

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना बाधितांवर उपचारसाठी रेमडेरसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

आढावा बैठक
आढावा बैठक
author img

By

Published : Apr 23, 2021, 11:15 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना बाधितांवर उपचारसाठी रेमडेरसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आमदार राम सातपुते, रणजितसिंह मोहिते पाटील, मुख्याधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदिप ढेले, मुख्यलेखाधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मोहिते उपस्थित होते.

लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या

जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शन टप्प्याटप्याने मिळणार असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गरजूंना प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपध्दीतीप्रमाणे वितरण करावे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत उपचाराची सुविधा निर्माण कराव्यात. तसेच त्यांना आवश्यक ती औषधे वेळेत उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यात वापरानुसार लसीचा साठा उपलब्ध होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने आवश्यकतेनुसार लस उपलब्ध होणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता सबंधित यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी केली.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

माळशिरस तालुक्यातील रुग्णसंख्या, सद्यस्थितीत असलेले ॲक्टीव्ह पेशंट, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा, नियमित होणारे टेस्टिंग आणि ट्रेसिंग आदींचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे असे, असे आवाहनही भरणे यांनी यावेळी केले. माळशिरस तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व औषधसाठा मिळावा, अशी मागणी आमदार राम सातपुते व आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मागणी केली.

गावांतील डॉक्टरांची उपचारासाठी मदत घ्या

ग्रामस्तरावरील ग्रामस्तरीय समित्या कार्यरत ठेवण्यात येणार असून, जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील शाळा, मठ, धर्मशाळा आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. त्या गावांतील डॉक्टरांची उपचारासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी स्वामी यांनी सांगितले. तालुक्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या, ॲक्टीव रुग्ण संख्या, विविध रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णबेड संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र याबाबतची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.