ETV Bharat / state

सुसाट वेगात मारला ब्रेक, क्रुझरची २-३ वेळा पलटी, 5 ठार, 7 जखमी, 2 गंभीर - सोलापूर कुलकर्णी पेट्रोल पंप अपघात

सोलापूर-अक्कलकोट रोडवरील (Solapur Akkalkot road) कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर एक क्रुजर गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

टायर फुटल्याने सोलापूर-अक्कलकोट रोडवर क्रुझर पलटी, 5 ठार, 7 जखमी, 2 गंभीर

author img

By

Published : Nov 16, 2021, 1:06 PM IST

Updated : Nov 16, 2021, 5:07 PM IST

सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट रोडवरील (Solapur Akkalkot road) कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर एक क्रुजर गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात (Solapur Hospital) उपचार केले जात आहेत.

सोलापूर-अक्कलकोट रोडवर क्रुझर पलटी; दोन ठार, अकरा जखमी

टायर फुटल्याने गाडी उलटली
प्राथमिक माहितीनुसार, अक्कलकोटहून सोलापूरकडे जाणारी क्रुजर गाडीचे (एमएच 13 एएक्स 1237) ड्रायव्हरच्या बाजूकडील टायर फुटल्याने चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरून पलटी झाली. ही गाडी अतिशय वेगात असल्याने ती दोन तीन वेळा उलटली. या अपघातात गाडीतील पाच प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाल, तर इतर अकरा जण जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार या गाडीतून सुमारे 13 ते 14 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, जखमींवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सोलापूर-अक्कलकोट रोडवरील महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. महामार्गावरून वाहने अधिक वेगाने जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मृतांची नावे
मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून सर्व अक्कलकोट तालुक्यातील रहिवासी आहेत. एका महिलेची मात्र ओळख पटली नाही. कट्ट्यावा यल्लप्पा बनसोडे (वय 55), बसवराज यल्लप्पा बनसोडे (वय 42), आनंद इर्राप्पा गायकवाड( वय 25 रा. ब्यागेहाळी, ता.अक्कलकोट), लक्ष्मण मुरलीधर शिंदे(वय 42, रा.बनजगोळ तालुका अक्कलकोट), व एक अनोळखी महिला(अंदाजे वय 35) अशी मृतांची नावे आहेत.

एसटी संपामुळे खासगी वाहनातून प्रवास जीवावर बेतला!
गेल्या 15 दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. बसस्थानकातून प्रवासी वाहतूकीची परवानगी खासगी वाहनांना दिली आहे. मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा आता परिसरात होत आहे.

सुसाट वेगात ब्रेक मारल्याने जीप पलटी!
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकोटहून प्रवासी घेऊन निघाल्यापासून चालक सतत फोनवर बोलत होता. सोलापूर शहराच्या विडी घरकुलजवळील एका पेट्रोल पंपासमोर एक खड्डा चुकविण्याच्या नादात जीप चालकाने जोराचा ब्रेक मारला. सुसाट वेगात असलेल्या वाहनाला जोराचा ब्रेक लागल्याने जीप दोन ते तीन वेळा पलटी झाली.

वळसंग पोलिसांची एकच धावपळ-
या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Last Updated : Nov 16, 2021, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.