ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट; व्हिडिओ कॉन्फरन्सने ऑनलाईन साक्षीद्वारे घटस्फोट मंजूर, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

author img

By

Published : Jul 8, 2020, 9:49 PM IST

Updated : Jul 8, 2020, 9:55 PM IST

सोलापुरात लग्न झालेल्या एका जोडप्याने सोलापुरातील कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पती-पत्नीचे जमत नसल्यामुळे घटस्फोटाची केस कौटूंबीक न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मागील सात महिन्यापासून या केसवर न्यायालयात सूनावणी सुरू होती. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबईत रहायला असलेल्या पतीला सोलापूरच्या कौटूंबीक न्यायालयात उपस्थित राहणे शक्य होत नसल्यामुळे पतीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष घेण्यात आली.

solapur
कौटुंबीक न्यायालय

सोलापूर - लॉकडाऊनच्या काळात पतीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष घेऊन कौटुंबीक न्यायालयाने घटस्फोटाचा निकाल दिला आहे. लॉकडाऊनमुळे पतीला मुंबईवरून येऊन सोलापूरच्या न्यायालयात उपस्थित राहणे शक्य नसल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष घेण्यात आली. त्यानंतर घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात सोलापुरातील कौटुंबीक न्यायालयाने हा घटस्फोटाचा निकाल दिला आहे.

लॉकडाऊन इफेक्ट; व्हिडिओ कॉन्फरन्सने ऑनलाईन साक्षीद्वारे घटस्फोट मंजूर, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

सोलापुरात 2017 मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याने सोलापुरातील कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पती-पत्नीचे जमत नसल्यामुळे घटस्फोटाची केस कौटूंबीक न्यायालयात दाखल करण्यात आली होती. घटस्फोटासाठी केस दाखल करण्यापूर्वी तसेच केस दाखल झाल्यानंतर देखील पती-पत्नीच्या कुटूंबीयांनी दोघांनी एकत्रित संसार करावा म्हणून प्रयत्न केले होते. दोघांच्याही मित्रांनी देखील संसार चांगला चालावा म्हणून प्रयत्न केले होते. मात्र कोणीही दोघांची समजूत काढू शकले नव्हते.

पती हा मुंबईला राहणारा होता. तर मुलगी ही सोलापूरची होती. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच नवरा बायकोमध्ये पटेनासे झाले. शेवटी हा वाद घटस्फोटापर्यंत गेला आणि त्यांनी सोलापूरच्या कौटूंबीक न्यायालयात केस दाखल केली. मागील सात महिन्यापासून या केसवर न्यायालयात सूनावणी सुरू होती. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबईत रहायला असलेल्या पतीला सोलापूरच्या कौटूंबीक न्यायालयात उपस्थित राहणे शक्य होत नसल्यामुळे पतीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष घेण्यात आली.

दोघांमध्ये घटस्फोट घेण्यासाठी एकमत झाले आणि पत्नीने कोणतीही पोटगी मागितलेली नव्हती. तसेच भविष्यात देखील काहीही मागणार नसल्याचे शपथपत्रावर लिहून दिले होते. पतीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष झाल्यानंतर सोलापूरच्या कौटूंबीक न्यायालयाने 3 जुलैला दोघांना घटस्फोट मंजूर केला आहे. सोलापूर येथील कौटुंबीक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वाय. जि. देशमुख यांनी अर्ज मंजूर केलेला आहे. पती व पत्नीतर्फे कौटुंबीक न्यायालय वकील संघाचे खजिनदार अॅड. संदेश सतिश कुलकर्णी यांनी काम पाहिले आहे.

Last Updated : Jul 8, 2020, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.