ETV Bharat / entertainment

'सिकंदर' चित्रपटातील सलमान खानचा नवीन लूक रिलीज, पाहा पोस्ट - salman khans New look - SALMAN KHANS NEW LOOK

Salman khan: सलमान खाननं 'सिकंदर'मधील त्याचा नवा लूक शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. 'भाईजान'ला पाहिल्यानंतर चाहते, त्यानं शेअर केलेल्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Salman khan
सलमान खान (सलमान खान (Movie Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 5:52 PM IST

मुंबई Salman khan: अभिनेता सलमान खान स्टारर 'सिकंदर' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आता 'भाईजान' ईद 2025 च्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर कमाईची सुनामी आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान 'सिकंदर' या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरला 'सिकंदर'मधील 'भाईजान'चा फर्स्ट लूक मानला जात आहे. 'सिकंदर'मधील रिलीज केलेलं पोस्टर हे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील सलमान खानचा लूक पाहून त्याचे चाहते थक्क झाले आहेत. आता 'भाईजान'चे चाहते आणि बॉलिवूड सेलेब्स त्याच्या लूकचं कौतुक करत आहेत.

सलमान खानचा 'सिकंदर'च्या सेटवरील फोटो व्हायरल : सलमान खाननं काल रात्री 24 सप्टेंबर रोजी त्याचा 'सिकंदर'मधील पहिला लूक शेअर केला.'भाईजान'चा हा लूक आता त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये 'सिकंदर'च्या सेटवरून सलमान हा जिम करताना दिसत आहे. या चित्रपटात सलमान खान अतिशय मजबूत आणि मसलमॅन लूकमध्ये दिसणार आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमानबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय यात सुनील शेट्टी, प्रतिक पाटील बब्बर, चैतन्य चौधरी, वत्सन चक्रवर्ती आणि सत्यराज हे कलाकर देखील असणार आहेत.

सलमान खानचं पोस्टर चर्चेत : आता सलमान खानच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पूर आला आहे. एकानं लिहिलं, 'शाहरुख आता गेला...'भाईजान' बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'वादळ येत आहे.' आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे, 'भाईजान फुल फॉर्ममध्ये आहे.' त्याचबरोबर 'सिकंदर'मधील सलमान खानच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. साजिद नाडियादवाला यांनी 'सिकंदर' या चित्रपटाची निर्मिती केली असून 'गजनी'चे दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास हा चित्रपट बनवत आहेत. आता अनेकजण सलमानच्या या आगामी चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. दरम्यान सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'पवन पुत्र भाईजान', 'नो एंट्री 2', 'किक 2' ,'दबंग 4' आणि 'इन्शाअल्लाह' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'या' दिवसापासून सुरू होणार 'बिग बॉस 18', सलमान खानच्या शोचा नवा प्रोमो रिलीज... - bigg boss 18 premier date out
  2. सलमान खानची दत्तक बहीण अर्पिता आणि आयुष शर्माच्या लग्नातला व्हिडिओ व्हायरल, पाहा स्टार्सचा मेळा - wedding video viral
  3. दुबई मॉलमध्ये सलमान खान हाय सिक्युरिटीसह झाला स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.