ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा-2'मधील 'अंगारों' गाण्यावर दोन चिमुकल्यांनी केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2 - PUSHPA 2

Two Kids danced on song Angaaron : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा-2' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी लोकांची पसंत बनला आहे. या चित्रपटामधील 'अंगारों' गाणं हे खूप धमाकेदार आहे. आता या गाण्यावर दोन चिमुकल्यांनी डान्स केला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Two Kids danced on song Angaaron
अंगारों या गाण्यावर दोन चिमुकल्यांनी डान्स केला (Song Poster/INSTAGRAM REEL)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 6:07 PM IST

मुंबई - Two Kids danced on song Angaaron : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ऍक्शन-ड्रामा चित्रपट 'पुष्पा 2: द रुल'च्या रिलीजला आता काही दिवस उरले आहेत. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची खूप उत्सुकता आहे. 'पुष्पा 2: द रुल'चा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची क्रेझ खूप वाढली आहे. अलीकडेच एका डान्स इव्हेंटमध्ये दोन चिमुकल्यांनी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या 'अंगारों' गाण्यावर खूप सुंदर डान्स केला. आता या छोट्या चिमुकल्यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

क्यूट कपल पुष्पा आणि श्रीवल्ली : व्हिडिओमध्ये दोन गोंडस मुले चित्रपटातील 'अंगारों' गाण्यावर धमाकेदार डान्स करत असून तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकाचं मनोरंजन करताना दिसत आहेत. व्हिडिओत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना सारखा पोशाख या चिमुकल्यांनी घातलेला दिसत आहे. गाण्यामधील सिग्नेचर मूव्ह्ज दोघेही खूप सुंदर पद्धतीनं करत आहेत. 'अंगारों' गाण्याचा व्हिडिओ रिलीज होताच हिट झाला आणि त्याच्या सिग्नेचर स्टेप्ससाठी ट्रेंडमध्ये आल्या होत्या. हे गाणं अजूनही सोशल मीडियावर खूप पसंत केलं जात आहे. दरम्यान या चिमुकल्यांच्या व्हिडिओला यूजर्स आता भरभरून लाईक्स देत आहेत.

'पुष्पा 2: द रुल'ची रिलीज डेट : या व्हायरल व्हिडिओवर यूजर्स चिमुकल्यांचं कौतुक करत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओवर लिहिलं की, 'खूप सुंदर अक्टिंग करते.' दुसरा एकानं लिहिलं, 'फॅन्टॅस्टिक.' आणखी एकानं लिहिलं, 'खूप सुंदर जोडी आहे.' या व्हिडिओवर अनेकजण हार्ट आणि इमोजी पोस्ट करत आहेत. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट रिलीज होण्याआधीच लोकांच्या मनावर राज्य करत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यावर नवीन रेकॉर्ड बनवेल अशी सध्या अपेक्षा केली जात आहे. 'पुष्पा 2: द रुल' 6 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. दरम्यान दिग्दर्शन सुकुमार यांनी मैत्री मुव्ही मेकर्सबरोबर या चित्रपटाची निर्मित केली आहे. या चित्रपटात अलू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल प्रमुख भूमिकेत आहेत. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचं संगीत टी - सीरीजनं दिलं आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजला 100 दिवस बाकी, अल्लू अर्जुनचं नवीन पोस्टर व्हायरल - Allu Arjun New Poster
  2. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 - द रुल'मधील क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू, व्हिडिओ क्लिप केली शेअर - pushpa 2 the rule
  3. सुकुमारनं रामोजी फिल्म सिटीमध्ये पुन्हा सुरू केलं 'पुष्पा 2' चं शूटिंग, जाणून घ्या अल्लू अर्जुन कधी होणार सामील - Pushpa 2 Update

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.