ETV Bharat / state

सोलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू - solapur grampanchayat election

सोलापुरातील 590 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. काही ग्रामपंचायतींचे निकालही हाती आलेत. माळशिरस तालुक्यात विजयसिंह मोहिते पाटील गटाचे वर्चस्व दिसत आहे.

सोलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू

author img

By

Published : Jan 18, 2021, 11:46 AM IST

Updated : Jan 18, 2021, 1:27 PM IST

पंढरपूर(सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रांबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर उमेदवार कार्यकर्त्यांची लगबग बघायला मिळते आहे.

काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती

जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा, बार्शी या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची पाहायला मिळत आहे. सकाळी साडेसात वाजता मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत विविध ग्रामपंचायतींचे निकालही आले आहेत.

मतमोजणीची पाचवी फेरी सुरू

मतमोजणीची पाचवी फेरी चालू करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यात 71 ग्रामपंचायत निवडणुका लागल्या. शिरगाव, मगरवाडी, शेंडगेवाडी, फुलचिंचोली, एकलासपूर, उंबरगाव, पोहोरगाव या गावातील निकाल हाती आला आहे.

विजयसिंह मोहिते पाटील गटाचे वर्चस्व

माळशिरस तालुक्यातील रेडे, विजयवाडी, विठ्ठलवाडी, पिरळे, गणेशवाडी, चाकोरे, तांबे या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल लागले आहे. त्यात सर्व ग्रामपंचायतींवर उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचा प्रतिष्ठितेची असणारी अकलूज ग्रामपंचायतीटी मत मोजणी शेवटी होणार आहे.

धान्य गोदामात नागरिकांची गर्दी

पंढरपूर आणि माळशिरस येथिल मतमोजणी वेळी शासकीय धान्य गोदामात नागरिकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निहाय निकाल ध्वनीक्षेपकावरुन जाहीर करण्यात येत आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी असेल अशाच प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात आहे.

हेही वाचा - राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज

Last Updated : Jan 18, 2021, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.