ETV Bharat / state

Corruption In Solapur Primary Health Centers : सोलापूर जिल्ह्यांतील रुग्णवाहिका चालकांच्या कंत्राटी भरतीत भ्रष्टाचार - Corruption In Solapur Primary Health Centers

सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय ग्रामीण रुग्णालयात भोंगळ कारभार पहायला मिळत आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयात ( Government Hospital ) व प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Primary Health Centre ) प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आता हळूहळू ते समोर येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून कारवाई होईल का असा प्रश्न उभा राहिला आहे.

rural hospitals and primary health centers
प्राथमिक आरोग्य केंद्र
author img

By

Published : Jul 22, 2022, 12:55 PM IST

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय ग्रामीण रुग्णालयात ( Government Hospital )व प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Primary Health Centre )रुग्णवाहिका चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली आहे. पण या भरती प्रक्रियेत संशयीतरित्या रुग्णचालकांची भरती केल्याची बाब समोर आली आहे. एकाच व्यक्तीची नियुक्ती दोन ठिकाणी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती दोन्ही ठिकाणी हजर न होता तिसऱ्याच ठिकाणी वाहन चालक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्हा ( Solapur District ) शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 24 रुग्णवाहिका चालकांची भरती ( Ambulance Drivers Recruitment ) करण्यात आली होती. तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 रुग्णवाहिका चालकांची भरती केली आहे. या भरत्या आऊटसोर्सिंग कंत्राटी पद्धतीने भरल्या आहेत. जालना येथील खाजगी कंपनी साई एजन्सी ( Sai Agency ) मार्फत ही भरती झाली आहे.

102 राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा - गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा ( Ambulance Service for Pregnant Women ) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता 102 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी सोलापुरातील ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक पदभरती सुरू आहे. वाहतुकीची सुविधा व आर्थिक अडचणीमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रसूतीपूर्वी व नंतर गर्भवतींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती.

एकाच व्यक्तीचे नाव दोन यादीत तिसऱ्या ठिकाणी व्यक्ती कामाला - जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 24 वाहनचालकांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये इब्राहिम कोरबु या व्यक्तीला सुरुवातीला 16 मार्च 2022 मधील यादीत करजगी अक्कलकोट तालूका ( Karjagi Akkalkot Taluka ) येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती दिली होती. पण 30 जून 2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राप्त झालेल्या यादीनुसार इब्राहिम कोरबु या व्यक्तीला शीरवळ ( Shirwal ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती दिली आहे. पण हे महाशय इब्राहिम कोरबु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांचे सरकारी वाहन चालवत आहेत. याची अधिक माहिती घेतली असता ते प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथे हजर होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आजतागायत वाहनचालक पद भरलेच नाही - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात वाहनचालकांचे पद रिक्त असताना देखील आजतागायत एकही वाहनचालक पद भरले नाही. उलट वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता इब्राहिम कोरबु या व्यक्तीस नियुक्त केले आहे. आणि गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांच्या सरकारी वाहनाचे स्टेअरिंग एका खाजगी व्यक्तीच्या हातात आहे.

शिफारशीनुसार भरती केल्याच संशय - सोलापुरातील जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात व आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णवाहिका चालकांच्या कंत्राटी भरत्या शिफारशीनुसार केल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.कारण या चालकांना रुग्णवाहिका चालविण्याचा अनुभव किती आहे,किंवा यांची पोलीस चारित्र्य तपासणी,यांची मेडिकल फिटनेस तपासणी,आणि यांची ट्रेनिंग याबाबत काहीही केले नाही.याची अधिक माहिती साई एजन्सीचे सोलापूर प्रतिनिधी प्रवीण पाटील यांना विचारणा केली असता,त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली अधिक खोलात जाऊन प्रतिक्रिया घेतली असता प्रवीण पाटील यांनी सांगितले की,जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या यादी प्रमाणे आम्ही ही यादी प्रसिद्ध केली आहे.

वाहनचालक कंत्राटी भरतीत भ्रष्टाचाराचा गंध - सोलापुरातील होत असलेल्या या रुग्णवाहिका वाहनचालक कंत्राटी भरतीत स्पष्टपणे भ्रष्टाचाराचे चित्र निर्माण झाले आहे. आरोग्य खात्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब याची सखोल चौकशी करून रुग्णवाहिका चालक पदाची भ्रष्टाचारमुक्त भरती करावी.या वाहन चालकांना रुग्णवाहिका चालविण्याचा अनुभव आहे का हे पडताळून पाहावे. रुग्णांना वेळेवर पोहोचवून त्यांना वेळेवर जीवदान देणे महत्वाचे आहे. मर्जीतील व्यक्तींना या ठिकाणी नियुक्त करून रुग्णांच्या जीवाशी खेळू नये अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

हेही वाचा - Mission 200 Incomplete : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 अपूर्ण, चंद्रकांत पाटलांचाही दावा ठरला फोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.