पंढरपूर - आज पोलीस प्रशासन संचारबंदीच्या काळात रस्त्यावर उतरून आपली सेवा बजावत आहे. मात्र, यादरम्यान अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होते. पंढरपूर येथील सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दीपक भोसले यांनादेखील कोरोनाची लागण झाली. मात्र, त्यांची प्रकृती ही गंभीर झाली होती. कुठेही उपचारासाठी बेड मिळत नव्हता. त्यावेळेस पंढरपूर येथील विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दीपक भोसले यांच्या मदतीला धावून आले. 'मी आहे ना, घाबरू नकोस' असे म्हणत तत्काळ एका खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून उपचार सुरू करण्यास सांगितले. दीपक भोसले यांनी बरे झाल्यानंतर अधिकारी कदम यांचे हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांच्या जीवाला जीव देणारा अधिकारी -
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दीपक भोसले हे 24 दिवसा खाली कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली होती. त्यातूनच अचानक प्रकृती खूपच गंभीर झालेले नातेवाईकांची धावपळ सुरू झाली होती. त्यातूनच जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध झाली नाही. वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे दीपक भोसले यांच्यासह नातेवाईकांनी हात टेकले होते. मात्र, त्यावेळेस दीपक भोसले यांची विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना माहिती मिळाली. त्या वेळेस त्यांनी तत्काळ दीपक भोसले यांची भेट घेऊन 'मी आहे घाबरू नकोस' असा धीर दिला होता. अधिकारी कदम यांनी वेळेत एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दीपक भोसले यांना बेड उपलब्ध करून देते तत्काळ उपचार सुरु केले. त्यामुळे 24 दिवसानंतर योग्य उपचार मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी दीपक भोसले यांनी कोरोना वर मात केली.
दीपक भोसले यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त -
पोलीस कर्मचारी दीपक भोसले यांची तब्बल 24 दिवसानंतर कोरोनावर मात केली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात 24 दिवस उपचार सुरु होते. उपचारादरम्यान विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडून पूर्णपणे लक्ष देण्यात आले. त्यावेळेस कदम यांनी माणुसकी दाखवत दीपक भोसले यांना मोठा धीर दिला होता. त्यामुळे दीपक भोसले यांनी करून वर मात केल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना अधिकारी कदम यांचे हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळेस कदम यांनी आपले कर्तव्य असल्याचे सांगत काळजी घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका; दोघांचा मृत्यू, २०० घरांचे नुकसान