ETV Bharat / state

जिल्ह्यातील गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा; पालकमंत्री जितेंद्र आव्हाडांची आढावा बैठकीत सूचना - Solapur District Review Meeting

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी करावी लागली आहे. या काळात स्थलांतरित मजूर, गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवठा होईल याची व्यवस्था करा, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत केली आहे.

Jitendra Awhad Guardian Minister Solapur
जितेंद्र आव्हाड पालकमंत्री सोलापूर
author img

By

Published : Apr 3, 2020, 7:58 PM IST

सोलापूर - जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यंना अनेक सूचना दिल्या. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी करावी लागली आहे. या काळात स्थलांतरित मजूर, गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवठा होईल याची व्यवस्था करा, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत केली आहे. यावेळी बैठकीत आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा... मोदींवर टीका करणाऱ्यांना आमदार राम कदमांनी दिले उत्तर; म्हणाले...

बैठकीच्या सुरवातीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री आव्हाड यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे गरीब, स्थलांतरित मजूर आणि निराधार लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. अन्नधान्याचा पुरेसा साठा करुन ठेवा. कमी पडत असल्यास आणखी मागवून घ्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केशरी कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य मिळत नसल्याबद्दल सांगितले. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सचिव संजय खंदारे यांच्याशी चर्चा केली जाईल. धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... ... आता आग नाही लावली म्हणजे झालं, दिवे लावण्याच्या कल्पनेवरुन मोदींवर सोशल मीडियावर टीका

वैद्यकीय उपाययोजनेसाठी आवश्यक असणारी व्हेंटीलेटर, साधन आणि यंत्र सामग्री तत्काळ मागवून घ्या. पीपीई किट, सॅनिटायझर, यांचा पुरेसा साठा सर्व शासकीय दवाखान्यात उपलब्ध करुन घ्या. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का, याची चाचणी करणारी रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करुन घ्यावीत, अशा सूचनाही आव्हाड यांनी दिल्या. निराधार, स्थलांतरित मजुरांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न उपलब्ध करुन द्या. यासाठी स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने, उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून मदत घ्या. यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र निधी उभारण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरु ठेवावेत यासाठी आवाहन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान एक कम्युनिटी क्लिनिक सुरु करा. या क्लिनिकसाठी खासगी डॉक्टरांना आवश्यक असणारी जागा, साहित्य आणि औषधे द्यावीत, असेही आव्हाड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.