ETV Bharat / state

बार्शीमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी - बार्शी कोरोना न्यूज अपडेट

बार्शी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. मात्र तरी देखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना चाप लावण्यासाठी बार्शी नगरपालिकेकडून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

author img

By

Published : Apr 20, 2021, 9:12 PM IST

बार्शी ( सोलापूर) तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. मात्र तरी देखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना चाप लावण्यासाठी बार्शी नगरपालिकेकडून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जे नागरिक कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे बार्शी तालुक्यात आढळून येत आहेत. सद्यस्थितीत 500 हुन अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याकरिता शहरात 8 कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. शिवाय शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकरिता नगरपालिका आणि पोलीस यंत्रणा तैनात आहे. असे असतानाही शहरातील पांडे चौक, भाजी मंडई या भागात नागरिकांची गर्दी होत आहे. संचारबंदीच्या सुरुवातीला चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, नागरिक हे विनाकारण घराबहेर पडत असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळेच आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

शहरातील विविध भागात नागरिकांची कोरोना चाचणी

मंगळवारी सकाळी शहरातील विविध ठिकाणी आरोग्य पथकाच्या वतीने नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. वाढत्या रुग्ण संख्येमुळे वेळोवेळी नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांना याचे गांभीर्य राहिलेले नाही. कोरोना रुग्णांची संख्या तर वाढत आहे, शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी ज्योती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे. रस्त्यावर गर्दी होऊ नये, त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्योती मोरे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळातही लसीकरण सुरूच राहणार

बुधवारपासून केवळ मेडिकल आणि भाजी विक्रीला परवानगी असणार आहे. अन्य आस्थापना या 10 दिवसासाठी बंद राहणार आहेत. परंतु, शहरात आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम सुरूच राहणार आहे. दरम्यानच्या, काळातही 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल अशी माहिती ज्योती मोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा 'केंद्राने सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्य सरकारने सोडू नये'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.