सोलापूर - जिल्ह्यात आज शनिवारी एकूण 107 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. यातील 50 जण बार्शी तालूक्यातील आहेत. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 817 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागातील अक्कलकोट, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालूक्यात कोरोना रूग्णांची संख्या ही प्रत्येकी शंभरच्या वर गेली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज शनिवारी आलेल्या अहवालानूसार 107 जणांना कोरोनाची लागण झाले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 50 जण हे बार्शी तालूक्यताली आहेत. आज सापडलेल्या कोरोना बाधितामध्ये 71 पुरूष आणि 36 स्त्रियांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 270 जणांनी कोरोनावर मात केली असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सोलापूर शहरात आज 86 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह आलेला आहे. शनिवारी एकूण 216 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 130 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 86 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालातून समोर आले आहे. अजूनही 234 अहवाल हे प्रलंबित आहेत. आतापर्यंत सोलापूर शहरात 3161 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूरात आतापर्यंत 298 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1749 जणांना कोरोनामधून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे तर 1114 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत