ETV Bharat / state

राज्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर सोलापुरात, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू - सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 822 झाली आहे. तर कोरोनामुळे तब्बल 72 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या भारतातील मृत्यूचे प्रमाण 2.8 टक्के आणि महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 3.3 टक्के इतके आहे़.

died corona patients in solapur
कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर सोलापुरात
author img

By

Published : May 29, 2020, 2:47 PM IST

सोलापूर - कोरोनामुळे मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा नऊ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 822 रुग्ण आढळले असून यातील 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरात मृतांचा आकडा अधिक आहे.

आता यापुढील काळात कोरोना संसर्ग रोखण्यासह मृत्यूदरावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे़. देशात सर्वाधिक मृत्यूदर पश्चिम बंगाल या राज्यात असून तो 6.1 टक्के एवढा आहे. अशात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील मृत्यूदरात सोलापूरने आघाडी घेतल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे़. सोलापूरात गुरूवारी आणि शुक्रवारी सकाळी 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 822 झाली आहे. तर कोरोनामुळे तब्बल 72 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या भारतातील मृत्यूचे प्रमाण 2.8 टक्के आणि महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 3.3 टक्के इतके आहे़. राज्य शासनाला सर्वाधिक काळजी वाटणारे शहर असलेल्या मुंबईतील कोरोना बळींचे प्रमाण 3. 2 टक्के इतके आहे़.

गुजरातमधील मृत्यूचे प्रमाण 6.1 टक्के इतके आहे़. कोरोनाचा फटका सर्वाधिक ज्या देशाला बसला त्या अमेरिकेतील मृत्यूचे प्रमाण 5.8 टक्के इतके आहे़. सध्या भारतात कोरोना मृत्यूचे प्रमाणा 2.87 इतके म्हणजे जगात सर्वात कमी आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. अशात सोलापुरातील मृतांचा वाढता आकडा चिंतेची बाब आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.