ETV Bharat / state

पंढरपूर मतदारसंघ पोट निवडणुकीचा फटका; कोरोनाच्या 600 नवीन रुग्णांची भर, 6 मृत्यू - By poll election pandharpur

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान पार पडले. प्रचार सभेमध्ये प्रस्थापित पक्षांकडून हजारोच्या गर्दीत सभा घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघात कोरोनाचा अक्षरशा स्फोट झाला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कोरोनाचा उच्चांक

author img

By

Published : Apr 30, 2021, 8:25 AM IST

पंढरपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. त्यानंतर मात्र आता या मतदारसंघात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. गुरुवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भागात सुमारे 600 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मतदारसंघात अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कोरोनाचा उच्चांक
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कोरोनाकाळात प्रचारसभा झाल्या.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची परिस्थिती बिकट..

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान पार पडले. प्रचार सभेमध्ये प्रस्थापित पक्षांकडून हजारोच्या गर्दीत सभा घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघात कोरोनाचा अक्षरशः स्फोट झाला आहे. 29 एप्रिल प्राप्त अहवालामध्ये दोन्ही तालुक्यात सुमारे सहाशे नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन्ही तालुक्यात साडेतीन हजार रुग्ण हे विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यात कोरोनाचा उच्चांक..

सोलापूर ग्रामीण भागामध्ये कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यात पंढरपूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा तालुक्यातील सुमारे आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण हे उपचार घेत आहेत. सध्या माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 2100 रुग्ण हे उपचार घेत आहेत. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार चार तालुक्यांमध्ये तेराशे नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूदरापैकी 50 टक्के मृत्यूदर हा पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा तालुक्यात नोंद झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

सोलापूर ग्रामीण भागात मोठ्या कोविड सेंटरची गरज..

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना स्वतःच्या कोविड सेंटरची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांना कोविड सेंटर उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत सेंटर उभारणीसाठी जोर धरत आहेत. पंढरपूर तालुक्यात सुमारे 19 नवीन सेंटर उभारण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.