ETV Bharat / state

पंढरपूरकरांनो प्रशासनाला सहकार्य करा; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन - Pandhrpur latest news

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Pndharapur corona updates
Pndharapur corona updates
author img

By

Published : Aug 7, 2020, 12:03 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा आणि दूध वितरण सुरू राहणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. हे काम करणाऱ्या पथकांना सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे. टाळाटाळ करू नका, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे.

तसेच मास्कचा वापर करा. सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने स्वच्छ धुवा. कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास तत्काळ रुग्णालयाशी संपर्क करून उपचार करून घ्या. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा. घाबरू नका. पण, जागरूक रहा. या काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही शंभरकर यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.