सोलापूर : बार्शी येथील विशाल फटे या राज्यभर गाजलेल्या आर्थिक घोटाळ्या संदर्भातील, सहआरोपी भाऊ वैभव फटे याला (Co-accused Vaibhav Fate granted bail) 10 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर विशाल फटे यांचे वडील अंबादास पाटील यांच्या जामीन अर्जावर 16 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती विशाल फाटे यांचे वकील विशाल दीप बाबर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
काय आहे प्रकरण -
बार्शी येथे अनेक सर्वसामान्य नागरिकांना शेअर मार्केटच्या नावाखाली ज्यादा पैसे मिळवून देतो म्हणून विशाल फटे यांनी कंपनी स्थापन केली होती. त्यात सर्वसामान्य बार्शीकर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र यामध्ये विशाल फटे याने नागरिकांना कोणताही परतावा न देता करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणारा विशाल फटे (The main accused Vishal Fate) हा आपल्या कुटुंबासह पोबारा केला होता. त्यानंतर त्यांने सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्मसमर्पण केले होते.
फाटे घोटाळ्यातील मुख्य आरोपी (Main accused in the Fate scam) असणाऱ्या विशाल फटे याच्यासह कंपनीमध्ये, भागीदार म्हणून घरातील भाऊ वैभव फटे व वडील अंबादास फटे यांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने दहा फेब्रुवारी रोजी सह आरोपी असणाऱ्या वैभव फटे यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. तर वडील अंबादास फटे यांच्या जामिनावर 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती वकील बाबर यांनी दिली आहे.