पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहाटे 2 वाजून 20 मिनिटे ते पहाटे 3 वाजेपर्यंत विठ्ठलाची शासकीय पुजा करणार आहेत. तर रुक्मिणी मातेची पहाटे 3 ते 3. 30 पहाटे मुख्यमंत्री ठाकरे सपत्नीक पुजा करणार आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा पहाटे पावणेचारनंतर सत्कार होणार आहे. तसेच विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कान्होपात्र ( तरटी) झाडाचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे उपस्थित राहणार आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून सर्व तयारी पूर्ण विठुराया व रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी पाच पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा - LIVE https://t.co/SEakOB1NUA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा - LIVE https://t.co/SEakOB1NUA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 19, 2021पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा - LIVE https://t.co/SEakOB1NUA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 19, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री आठ तास चारचाकी चालून पंढपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. तरी दरवर्षीप्रमाणी शासकीय महापुजा पार पडणार आहे.