ETV Bharat / state

सोलापूर; सिद्धेश्र्वर महाराज मंदिराच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात - Siddheshwar Temple solapur news

सोलापूरातील विजापुर वेस ते पंच कट्टा या दरम्यान जुन्या काळात एक टेकडी होती. एका सुफी संतने येथे वास्तव्य केले होते. त्यांचे नाव होते मुल्ला. त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी मुल्ला यांची समाधी स्थापन करण्यात आली. याला मुल्ला बाबा टेकडी असे नाव पडले.

कारवाई
कारवाई
author img

By

Published : Apr 3, 2021, 4:53 PM IST

Updated : Apr 3, 2021, 5:46 PM IST

सोलापूर - सिद्धेश्वर महाराज मंदिर पंच कमिटीच्या अनेक वर्षे न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले आहे. पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावर गेल्या पन्नास वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. अखेर दिवाणी न्यायालयाने हे सर्व अतिक्रमणे काढण्याचा आदेश पारित केला आहे. कोर्टाच्या या आदेशाची अंमलबजावणी करत आज शनिवारी सक्तीने सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमण केलेल्या नागरिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सिद्धेश्र्वर महाराज मंदिराच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात

शहराच्या मधोमध मुल्लाबाबा टेकडी
विजापुूर वेस ते पंच कट्टा या दरम्यान जुन्या काळात एक टेकडी होती. एका सुफी संतने येथे वास्तव्य केले होते. त्यांचे नाव होते मुल्ला. त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी मुल्ला यांची समाधी स्थापन करण्यात आली. याला मुल्ला बाबा टेकडी असे नाव पडले. 1950 नंतर येथे दाट लोकवस्ती होण्यास सुरुवात झाली. आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली.

हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएसकडे

सिद्धेश्वर पंच कमिटीने दाखल केला होता दिवाणी न्यायालयात खटला
मुल्ला बाबा टेकडीवरील 8 गुंठे जमीन ही सिद्धेश्वर महाराज मंदिर देवस्थान समितीची आहे. अनेक धार्मिक रीतिरिवाज या जागेवर केल्या जातात. पण येथे झालेल्या अतिक्रमणमुळे मंदिराचे कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पाडता येत नव्हते. सिद्धेश्वर पंच कमिटीने याबाबत दिवाणी न्यायालयात जमिनीचे पुरावे सादर केले. अखेर कोर्टाने मंदिराच्या जागेवर करण्यात आलेली अतिक्रमणे काढण्याचा आदेश दिला आहे.

अतिक्रमण मार्गावरील कारवाई सुरू
आज शनिवारी सकाळी अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर मोठा तणाव निर्माण झाला होता.कारण अतिक्रमणे ही अतिशय दाट केली होती.आणि काही नागरिकांचा रहिवास देखील होता.मोठा विरोध होईल या भीतीपोटी अतिक्रमण विभागाने आणि कोर्टाच्या कर्मचाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त मागविला होता.तसेच पंच कट्टा ते विजापुर वेस या मार्गावरील सार्वजनिक रस्ता बंद केला होता.हा रस्ता कधी सुरू होणार. याचे तपशील अजूनही वाहतूक शाखेने दिले नाही.नागरिकांना हा रस्ता बंद असल्यामुळे वळसा घालून जावे लागत आहे.

हेही वाचा - पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Last Updated : Apr 3, 2021, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.