सोलापूर - जिल्ह्यातील कोणत्याही पक्षामध्ये बर्ड फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळून आलेली नाहीत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. बहुतांश नागरिक हे चिकन शिजवून खातात. त्यामुळे कोणतेही विषाणू 100 अंश सेल्सिअसला जिवंत राहत नाहीत, असे पालकमंत्री म्हणाले.
पक्षी मृत झाल्यास प्रशासनास कळवावे
कोणत्याही प्रकारचा पक्षी मृत झाल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्या पक्षाचे स्वॅब, रक्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचेही पालमंत्री भरणे यांनी सांगतिले.
बर्ड फ्लूसाठी गावरान कोंबडीला 90 रुपये, बॉयलरला 70 रुपये अन अंड्याला 3 रुपये मदत
बर्ड फ्लूमुळे मृत पावलेल्या व नष्ट केल्या जाणाऱ्या कोंबड्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. गावरान कोंबडीला 90 रुपये, दोन महिन्यांवरील बॉयलर कोंबड्यांना 70 रुपये, दोन महिन्याच्या आतील पिलांना वीस रुपये याप्रमाणे मदत केली आहे. तसेच अंडी पोल्ट्री चालकांना 3 रुपये प्रति अंडा मदत केली जाणार आहे. नष्ट केल्या जाणाऱ्या अंड्यासाठी प्रति अंडी तीन रुपयांची मदत केली जाणार असल्याचेही यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात 27 लाख कोंबड्या
सोलापूर जिल्ह्यात सध्या 27 लाख कोंबड्या आहेत. त्यामध्ये अंडी देणाऱ्या 18 लाख कोंबड्या आहेत. बॉयलर जातीच्या 9 लाख कोंबड्या सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चिकन विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
हेही वाचा - मकर संक्रांतिनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास
हेही वाचा - हर्र बोला हर्र..च्या जयघोषात भक्तांविना सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न