सोलापूर - बाललैंगिक अत्याचाराला वाचा फुटावी यासाठी सोलापूरात कॅक्टस फौंडेशनच्यावतीने आज प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता बालकांच्या प्रति समर्पित या रॅलीचे उद्घाटन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते करण्यात आले. डफरीन चौक ते पार्क मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या शहरातील प्रमुख शाळांतील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित बालक आणि पालकांनी चुप्पी तोडोच्या घोषणा दिल्या.
या रॅलीत देश विदेशातून अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते. बालकांवर लैंगिक अत्याचार होतात तेव्हा पालक म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देतो का? अशा घटनांबाबत बोलायला पाहिजे. तसेच कोणता स्पर्श योग्य आणि कोणता अयोग्य, याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी. ती जाणीव निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.