ETV Bharat / state

सोलापूरजवळ केमिकल टँकर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; दोन्ही वाहने जळून खाक - सोलापूरजवळ केमिकल टँकर व ट्रकचा अपघात

कुरुल-मोहोळ महामार्गावर ज्वलनशील केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली व दोन्ही वाहनांना आग लागली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास टप्प होती.

Chemical tanker and truck burn
सोलापूरजवळ केमिकल टँकर व ट्रकचा अपघात
author img

By

Published : Nov 22, 2020, 3:48 PM IST

Updated : Nov 22, 2020, 4:21 PM IST

सोलापूर - कुरुल-मोहोळ महामार्गावर ज्वलनशील केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. हा अपघात रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

कुऱ्हाडीने टँकरचे दार तोडून चालकाचा वाचविला जीव-

कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या वैष्णवी ढाब्यासमोर रविवारी सकाळी केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने आग लागली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारून आपला जीव वाचवला. पण टँकरमधील चालकाला बाहेर पडता येत नव्हते. स्थानिक नागरिकांनी कुऱ्हाडीने टँकरचे दार तोडून त्याला बाहेर काढले आणि टँकर चालकाचा जीव वाचवला.

सोलापूरजवळ केमिकल टँकर व ट्रकची समोरासमोर धडक

तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात -

अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. अनगर येथील साखर कारखान्याच्या अग्निशमन गाडीने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांने आग आटोक्यात आणली.

महामार्गावर वाहतूक कोंडी -

दोन्ही वाहने जळत असताना पोलिसांनी वाहतूक थांबवली. आग एवढी भीषण होती की, त्याच्या झळा लांबपर्यंत जाणवत होत्या. आकाशात धुराचे लोट पसरले होते. महामार्गावरील जड वाहतूक तीन तास थांबवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Last Updated : Nov 22, 2020, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.