ETV Bharat / state

Girl Cheated In Pandharpur : पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून पंढरपुरात मुलीची फसवणूक - पंढरपुरात मुलीची फसवणूक

मी पोलीस असून, तुला पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून, मुलीला लग्नासाठी तगादा लावत फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली ( Girl Cheated By Fake PSI ) आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस असल्याचे भासवण्याचा आरोपी पोलिसांच्या पेहरावात वावरत ( Fake PSI Arrested In Pandharpur ) होता.

पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून पंढरपुरात मुलीची फसवणूक

author img

By

Published : Mar 18, 2022, 3:52 PM IST

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात एका मुलीला 'तुला पोलीस भरती करतो तसेच मी पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझे वडील आयपीएस अधिकारी आहे' अशी बतावणी करून मुलीशी लग्न करण्यासाठी घरच्यांची संपर्क वाढवून फसवणूक केल्याप्रकरणी ( Girl Cheated By Fake PSI ) तोतया पोलिसाला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली ( Fake PSI Arrested In Pandharpur ) आहे. रमेश सुरेश भोसले (वय 22, रा. यलमा मंदिराजवळ आंबे ता. पंढरपूर) असे तोतया पोलिसाचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून पंढरपुरात मुलीची फसवणूक

लग्नासाठी लावला होता तगादा

पंढरपूर तालुक्यात एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. सहा महिन्यापूर्वी रमेश भोसले याच्याशी त्या मुलीची ओळख झाली. रमेश भोसले यांनी त्या मुलीला मी तुला पोलीस भरतीला मदत करतो. मी मंगळवेढा पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत. अशी खोटी माहिती संबंधित मुलीला दिली होती. मुलीला व तिच्या घरच्यांशी संबंध वाढवण्यासाठी रमेश भोसले हा खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत हे भासविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तूल वेश परिधान करत होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांचा संपर्क वाढवून त्यांनी वारंवार लग्नासाठी तगादा लावला होता.

अन् आला संशय

रमेश भोसले या याच्या अशा वागण्यामुळे सदर मुलीच्या घरच्यांना संशय निर्माण झाला. सदर मुलीच्या नातेवाईकांनी मंगळवेढा पोलिस ठाणे व पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चौकशी केली असता अशा प्रकारचा कोणताही अधिकारी नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक होत असल्याचे मुलीच्या घरच्यांना समजून आले. मुलीने तात्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाकडे याबाबत माहिती दिली. संबंधित मुलीला रमेश भोसले याला भेटण्यासाठी सांगण्यात आले. रमेश भोसले सदर मुलीच भेटण्यास आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पंढरपुर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.