पंढरपूर (सोलापूर) - करमाळा शहरातील जुगार अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मन्ना जुगार खेळणार्या 40 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 6 लाख 89 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार खेळणाऱ्या 40 जणांवर गुन्हा दाखल
करमाळा शहरातील कर्जत रस्त्यावरील स्वागत धाब्याच्या पाठीमागे संतोष जाधव यांच्या मालकीच्या जागेवर मोठा जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला मोठ्या प्रमाणावर जुगार खेळताना दिसून आले. त्यानंतर, करमाळा पोलीस ठाण्यात अक्षय गायकवाड (23 वर्षे), अजय कुमार पंडित (32 वर्षे), अविनाश मंडलिक (21 वर्षे), संभाजी गायकवाड (39 वर्षे), ऋषीकेश आलाट (22 वर्षे) याच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
जुगार अड्डावरील 1 लाख 58 हजाराची रोकड जप्त
सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाकडून करमाळ्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. येथे 40 जण मन्ना नावाचा जुगार खेळताना सापडले. यावेळी त्यांच्याकडून 1 लाख 58 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि वाहने, मोबाईल, असा एकूण 6 लाख 89 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.
हेही वाचा - वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयातून चोरलेली रुग्णवाहिका पोलिसांना गवसली