ETV Bharat / state

पूर येऊन दोन महिने झाले, केंद्राचे पथक आत्ता येतंय; सोलापुरातील शेतकऱ्यांच्या भावना - Yashpal, Deputy Secretary, Central Rural Development Department

ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांनी केंद्रीय पथक आज मंगळवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहे.

केंद्रीय पाहणी पथक
केंद्रीय पाहणी पथक
author img

By

Published : Dec 22, 2020, 4:48 PM IST

सोलापूर - ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांनी केंद्रीय पथक आज मंगळवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहे. हे पथक मोहोळ, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी करत आहे. या पथकासमवेत जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हाधिकारी आहेत. यावेळी पथकासमोर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि गाऱ्हाणे मांडले. साहेब पूर येऊन दोन महिने झाले. आता येऊन काय फायदा,आम्हाला अद्यापही मोबदला मिळाला नाही, अशी खंत मोहोळ येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकरी
केंद्रीय पथकाचा दौरा नुसता शो-

केंद्रीय पथक आज सोलापूर दौऱ्यावर आले असून, या पथकाने घाई गडबडीत शेतपिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तर काही ठिकाणी लांबूनच पाहणी करून पुढे सरकले. एकंदरीत केंद्रीय पथकाचा दौरा नुसता शो ठरला. यावेळी पाहणी काय करता, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

केंद्रीय पथकात हे आहेत अधिकारी-

औरंगाबाद , उस्मानाबाद नंतर हे पथक आज सोलापूर दौऱ्यावर आले आहे. या केंद्रीय पथकात नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव रमेश घंटा, केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल, नागपूर कृषी विभागाचे संचालक ओ. पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, नागपूर जलशक्ती विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांचा समावेश आहे.

या गावातील नुकसानीची करणार पाहणी-

मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव, पेनूर येथील शेतकर्‍यांच्या शेतातील शेतीपिके व अन्य नुकसानीची पाहणी करत आहेत. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, टाकळी, सांगोला तालुक्यातील संगेवाडी, बामणी आणि वाढेगाव तसेच मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे भेटी देऊन शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम-

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व त्यामुळे आलेल्या महापुराने जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूरबरोबरच अन्य तालुक्यातील शेतपिकांची मोठी हानी झाली होती. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकर्‍यांना अर्थसहाय करण्याचे आश्वासन देऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करून जिल्ह्यात 935 कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला होता.

दरम्यान, शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु केंद्र सरकारने काहीही मदत केली नाही. आता तब्बल दोन महिन्यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी पथक पाठवून अश्रूग्रस्त शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविला आहे. केंद्र सरकारच्या या दिरंगाईबद्दल शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुलुंड टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.