ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या 18 जणांविरूद्ध गुन्हे दाखल, ग्रामीण पोलिसांची कारवाई

संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगोला पोलीस ठाण्यांतर्गत 17 तर उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावातील एका विरोधात, असे एकूण 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर
पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर
author img

By

Published : Mar 26, 2020, 1:10 PM IST

सोलापूर - राज्यासह देशात संचारबंदी लागू केलेली असताना तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलेला असताना कायदा मोडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 10 जणांविरूद्ध पोलिसांनी गून्हे दाखल केले आहेत. सांगोल्यातील 17 जणांवरिद्ध आणि वडाळा येतील एका विरूद्ध पोलिसांनी गून्हा दाखल केला आहे.

संपूर्ण देशात कोरोनामुळे संचारबंदी लागू केलेली आहे. एकमेकांच्या सहवासात आल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होते आणि एकापासून दूसऱ्याला रोग होत असल्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अनेकजण याला गांभीर्याने घेत नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 18 जणांविरूद्ध गून्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगोला येथे 17 जणांविरूद्ध आणि उत्तर तालुक्यातील वडाळा या गावातील एका विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या सर्वांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, मूंबई पोलीस अधिनियमन, साथीचे रोग नियंत्रण अधिनियमन या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरल्यामुळेच हे गून्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा - सोलापुरात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद, गर्दी टाळण्यासाठी निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.