नवी दिल्ली : विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये येत्या 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यात राज्यातील पंढरपूर विधानसभेसह देशातील 14 विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
असे असेल निवडणूक वेळापत्रक
निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 23 मार्च रोजी निवडणुकीचे नोटीफिकेशन काढले जाईल. यासोबतच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. 30 मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 3 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 17 एप्रिल रोजी या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 2 मे रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासोबतच या निवडणुकांचेही निकाल जाहीर होतील.
या जागांवर पोटनिवडणूक
लोकसभा मतदारसंघ
- तिरूपती(आंध्र प्रदेश)
- बंगळुरू(कर्नाटक)
विधानसभा मतदारसंघ
- मोरवा हडफ(गुजरात)
- माधुपूर(झारखंड)
- बसवकल्याण(कर्नाटक)
- मस्की(कर्नाटक)
- दमोह(मध्य प्रदेश)
- पंढरपूर(महाराष्ट्र)
- सेर्चिप(मिझोराम)
- नोक्सेन(नागालँड)
- पिपिली(ओडिशा)
- सहारा(राजस्थान)
- सुजनगड(राजस्थान)
- राजसमंद(राजस्थान)
- नागार्जुन सागर(तेलंगणा)
- साल्ट(उत्तराखंड)
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणाचा सरकारवर परिणाम नाही, महाआघाडीत सर्वकाही सुरुळीत - पवार