ETV Bharat / state

सोलापुरात एनटीपीसी रस्त्यावर आढळला जळालेला मृतदेह, हत्या की आत्महत्या पोलीस संभ्रमात - गोदूताई परुळेकर

होटगी ते एनटीपीसी रस्त्यावर एका युवकाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आज (दि. 30 डिसें) आढळला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून पोलीस तपास करत आहेत.

आढळलेला मृतदेह
आढळलेला मृतदेह
author img

By

Published : Dec 30, 2019, 1:27 PM IST

सोलापूर - होटगी ते एनटीपीसी रस्त्यावर एका तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आज (दि. 30 डिसें) आढळला आहे. त्यामुळे या तरुणाची हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलीस पंचनाम्यावेळी या तरुणाच्या हाताला दोरा आणि बांधलेलं पान आढळून आले आहे. शिवाय त्याची ओळख पटली असून आज त्याच्या घरी विवाह ठरल्याचा कार्यक्रम होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नरेश श्रीहरी चिलगानी (वय 26 वर्षे, रा. कुंभारीच्या गोदूताई परुळेकर विडी घरकुल), असे त्या जळालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या घरापासून घटनास्थळी येणाऱ्या मार्गावर एक पोते आढळले आहे. त्यामुळे त्याला पोत्यात घालून एनटीपीसी रस्त्यावरील निर्जनस्थळी आणण्यात आले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञात कारणावरून त्याचा घात करण्यात आला, की त्याने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली याचा तपास वळसंग पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या होटगी ठाण्याच्या पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा - चारचाकीची ट्रॅक्टरला धडक, दोघे जळून ठार

दोनच दिवसांपूर्वी प्रेमप्रकरणातून सोलापुरात एका फूटबॉलपटूचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आज होटगी- एनटीपीसी रस्त्यावर पुन्हा जळालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नरेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला असून सोलापूर ग्रामीण पोलीस या प्रकारणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा - 'युजीसी'च्या परिपत्रकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून केराची टोपली

Intro:सोलापूर : होटगी ते एनटीपीसी रस्त्यावर एका युवकाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आज आढळला आहे.सुरुवातीला हत्या की आत्महत्या याबाबत संदिग्धता होती.मात्र आता पोलीस पंचनाम्यानंतर आत्महत्या असल्याचे पोलीसांनी सांगितलं आहे.

Body:कुंभारीच्या गोदूताई परुळेकर विडी घरकुल येथे राहणाऱ्या नरेश श्रीहरी चिलगानी वय 26 वर्षे यानं अज्ञात कारणावरून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.वळसंग पोलीस स्टेशन अंकित होटगी स्टेशन पोलीसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Conclusion:दोनचं दिवसांपूर्वी सोलापूरात एका फूटबॉलपटूचा खून करण्यात आला होता.त्यानंतर आज होटगी- एनटीपीसी रस्त्यावर पुन्हा जळालेला मृतदेह सापडल्याने चर्चेला उधाण आलं होतं.मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक खुलासा केला आहे.ते पुढील तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.