ETV Bharat / state

नोकरीमागे न लागता, उस्मानाबादेतील तरुणाने सुरू केला फाटक्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय - shahabaz shaikh

उच्च शिक्षण घेऊनही सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये द्यायचे कुठून? या चिंतेत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने आगळावेगळा व्यवसाय सुरू करून बेरोजगारांसमोर एक आदर्श उभे करण्याचा काम केला आहे.

वैभव पाटील
author img

By

Published : Jun 1, 2019, 10:18 AM IST

सोलापूर - उच्च शिक्षण घेऊनही सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये द्यायचे कुठून? या चिंतेत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने फाटक्या चलनी नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. वैभव पाटील असे या तरुणाचे नाव आहे. यातून त्याला महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये मिळत आहेत. वैभवच्या या आगळ्यावेगळ्या व्यवसायावर ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.

ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात असलेल्या वाकडी गावच्या वैभवचे शिक्षण बी.एस्सी., बी. एड.पर्यंत झाले आहे. नोकरीसाठी त्याने विविध संस्थांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी नोकरीसाठी पंधरा ते वीस लाख रुपयांची मागणी संस्थाचालकांकडून होत होती. पण, इतके पैसे द्यायचे कोठून, असा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला. वैभवकडे वडिलोपार्जित दहा एकर कोरडवाहू शेत जमीन आहे. पण, दुष्काळामुळे शेतीतून पुरेसे उत्पन्नही मिळत नव्हते. या सर्व प्रश्नांवर मार्ग शोधत वैभवने नाविन्यपूर्ण असलेला व्यवसायास सुरुवात केली. तो व्यवसाय म्हणजे चलनातील फाटक्‍या नोटा बदलून देण्याचा.

उंदराने कुरतडलेल्या, कपडे धुताना खिशात चुरगळलेल्या, अर्धवट जळालेल्या, रंग लागून खराब झालेल्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग ते लोक वैभवकडे येतात आणि फाटक्या नोटा बदलून घेतात. वैभव पाटीलही यासाठी काही सर्व्हिस चार्ज घेतात.

वास्तविक कोणत्याही बँकेत गेले तर फाटक्या नोटा किंवा रंगलेल्या नोटा या बदलून मिळतात. मात्र, ग्रामीण भागांमध्ये बँकांची संख्या कमी असते. अनेकांकडे बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्यासाठी वेळ नसतो. या गोष्टींमुळे फाटक्या नोटा जवळ असलेले लोक वैभवकडूनच नोटा बदलून घेतात.

हा व्यवसाय करत असताना वैभव त्याच्या गावापासून सुमारे शंभर किलोमीटरच्या परिसरात असलेल्या मोठ्या आठवडी बाजारात जातो. आठवडी बाजारात फिरून फाटलेल्या नोटा बदलून देतो. हा व्यवसाय करत असताना व्यवसायाची जाहिरातही वैभवने कल्पकतेने केली आहे. डोक्यावरील टोपीवर आणि खिशातील पाटीवर फाटक्या नोटा बदलून मिळतील, अशी जाहिरात वैभव करतो. वैभवचे वडीलही हाच व्यवसाय करतात. वैभवचा हा नावीण्यपूर्ण व्यवसाय राज्यातील तरुणांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे.

Intro:R_MH_SOL_28_MAY_2019_FATKYA_NOTA_BUSSINES_S_PAWAR
फाटक्या नोटा बदलून देण्याचा नावीन्यपूर्ण व्यवसाय, नोकरीच्या मागे न लागता शोधली नवी वाट
सोलापूर-
उच्च शिक्षण घेऊन ही सरकारी नोकरी साठी लाखो रुपये द्यायचे कुठून या विवंचनेत असलेल्या एका तरुणाने आगळा वेगळा व्यवसाय सुरू केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वैभव पाटील या तरुणाने फाटक्या चलनी नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये कमाई सुरू केली आहे वैभव पाटील या तरुणाच्या या आगळ्यावेगळ्या व्यवसायावर ईटीवी भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.

Body:R_MH_SOL_28_MAY_2019_FATKYA_NOTA_BUSSINES_S_PAWAR
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या वाकडी या गावचा वैभव पाटील हा तरुण. वैभव पाटील याचे शिक्षण हे bsc बी एड. शाळेवर नोकरीसाठी गेलं तर पंधरा ते वीस लाख रुपयांची मागणी संस्थाचालकांकडून होती एवढ्या मोठ्या प्रमाणावर संस्थाचालकांना पैसे द्यायचे कुठून हा प्रश्न वैभव पाटील यांना सतावत होता वैभव यांच्या घरी वडिलोपार्जित दहा एकर जमीन ही दहा एकर जमीन देखील कोरडवाहू . कोरडवाहू जमीन असल्यामुळे शेतीतील उत्पन्नाला मर्यादा आणि त्यातही उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतातून काय मिळणार या सर्व प्रश्नावर मार्ग शोधत वैभव पाटील यांनी नाविन्यपूर्ण असलेल्या व्यवसायास सुरुवात केली हा व्यवसाय म्हणजे चलनातील नोटा फाटलेले आहेत त्या फाटक्‍या नोटा बदलून द्यायचा.
उंदराने कुरतडलेल्या, कपडे धुताना खिशात चुरगळलेल्या, अर्धवट जळालेल्या, रंग खराब झालेल्या, तसेच ग्राहकांकडे असलेल्या फाटक्या नोटांचे करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग ते लोक वैभवकडे येतात आणि फाटक्या नोटा बदलून घेतात. वैभव पाटील हे देखील सर्व्हिस चार्ज म्हणून काही रक्कम घेतात आणि फाटक्या नोटा बदलून देतात.

वास्तविक कोणत्याही बँकेत गेले तर फाटक्या नोटा किंवा रंगलेल्या नोटा या बदलून मिळतात मात्र ग्रामीण भागांमध्ये बँकांचे असलेली कमतरता तसेच अनेकांकडे बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्यासाठी नसलेला वेळ आणि दहा रुपये शंभर रुपये पर्यंत च्या नोटे साठी बँकेत जायचं कशाला या सर्व गोष्टीमुळे फाटक्या नोटा असलेले लोक हे वैभव करूनच नोटा बदलून घेतात या नोटा बदलून देत असताना सर्विस चार्ज म्हणून वैभव हा काही ठराविक रक्कम घेतो आणि नोटा बदलून देतो.
हा व्यवसाय करत असताना वैभव हा त्याच्या गावापासून 100 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या मोठ्या आठवडी बाजारात जातो आणि आठवडी बाजारात फिरून फाटलेल्या नोटा गोळा करतो हा व्यवसाय करत असताना व्यवसायाची जाहिरात ही वैभवने कल्पक अशा पद्धतीने केलेली आहे. डोक्यावर टोपी आणि खिशामध्ये पाटी .... डोक्यावरील टोपी वर आणि खिश्यातील पाटीवर फाटक्या नोटा बदलून मिळतील असे लिहून टोपी डोक्यावर आणि पाटी खिश्यात ठेवून वैभव हा जाहिरात करतो.
वैभव चे वडील देखील हाच व्यवसाय करतात. वडिलांचा हा व्यवसाय चांगला आहे आणि यातच आपण पुढे जावं अस ठरवून वैभवने हा नोटा बदलून द्यायचा व्यवसाय सुरू केला आहे. वैभवचा हा नावीन्यपूर्ण व्यवसाय राज्यातील तरुणांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे.

Conclusion:नोट-
एडिट केलेला व्हिडीओ सोबत जोडत आहे. संपूर्ण व्हिडीओ वापरावा.....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.